Birthday Special : रॅपर बादशाह गायक झाला नसता तर या क्षेत्रात केले असते करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 15:30 IST2018-11-19T15:22:26+5:302018-11-19T15:30:39+5:30
बॉलीवूडचा रॅपर किंग बादशाहचा आज 33वा वाढदिवस आहे. दिल्लीतील पंजाबी कुटुंबात बादशाहचा जन्म झाला. बादशाहचे खरं नाव आदित्य प्रतिक सिंग सिसौदिया आहे.

Birthday Special : रॅपर बादशाह गायक झाला नसता तर या क्षेत्रात केले असते करिअर
बॉलीवूडचा रॅपर किंग बादशाहचा आज 33वा वाढदिवस आहे. दिल्लीतील पंजाबी कुटुंबात बादशाहचा जन्म झाला. बादशाहचे खरं नाव आदित्य प्रतिक सिंग सिसौदिया आहे. बॉलीवूडमध्ये मात्र तो बादशाह नावावने ओळखला जातो. 2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. बादशाहला आज किंग ऑफ रॅप म्हणून ओळखले जाते. आई-वडिलांच्या इच्छेखातर बादशाहने इंजिनिरिंगचे शिक्षण घेतले पण त्याला माहिती होते त्याला काय करायचे आहे ते. त्याला लहानपणापासूनच संगीताची गोडी होती त्यामुळे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर तो त्याकडे वळलो. जर बादशाह गायक झाला नसता तर तो आयएएस अधिकारी झाला असता असे त्यांने एका मुलाखतीत सांगितले होते.
'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यानंतर त्याला खरी ओळख मिळाली कारण या गाण्यात त्याचा चेहरा देखील दिसला होता. याआधी त्याचं 'सैटरडे -सैटरडे' हे गाणं सुद्धा आले होते मात्र अभी तो पार्टी शुरु हुई है'नंतर प्रेक्षक त्याला बादशाह म्हणून ओळखू लागले. बादशाहच्या मतं रिअॅलिटी शोजमुळे देशातील चांगले टॅलेंट जगासमोर येतेय. लवकरच तो रॅपबरोबर दिग्दर्शनही करणार आहे तसेच मी माझे हॉटेलदेखील सुरु करतोय.