Birthday Special : बॉबी देओल व नीलमचे ब्रेकअप झाले अन् बदनाम झाली पूजा भट्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 16:31 IST2021-01-27T16:29:03+5:302021-01-27T16:31:06+5:30
आज बॉबी देओलचा वाढदिवस...

Birthday Special : बॉबी देओल व नीलमचे ब्रेकअप झाले अन् बदनाम झाली पूजा भट्ट!
बॉलिवूडच्या अनेक अफेअरची चर्चा तर खूप झाली, पण यापैकी अनेकांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. बॉबी देओल आणि नीलम कोठारी यांचे नाते याच यादीत येते. 90 च्या दशकात बॉबी व नीलमच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण 5 वर्षांत दोघांचे ब्रेकअप झाले. या अधु-या प्रेमकहाणीतील विलेन होते, स्वत: बॉबीचे डॅडी धर्मेन्द्र. पण त्यावेळी बदनाम झाली ती पूजा भट्ट.
होय, बॉबी व नीलम प्रेमात असताना आणि दोघेही लग्न करणार असल्याचे मानले जात असताना अचानक दोघांच्या बे्रकअपची बातमी आली आणि पाठोपाठ या ब्रेकअपसाठी पूजा भट्टला दोषी ठरवले गेले. बॉबी व पूजा भट्टची जवळीक वाढल्यामुळे नीलमने बॉबीशी ब्रेकअप केले, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. अर्थात पुढे अनेक वर्षांनी एका मुलाखतीत खुद्द नीलमने या चर्चा खोट्या ठरवल्या होत्या.
स्टारडस्ट या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत नीलम यावर बोलली होती. बॉबी व माझे ब्रेकअप कोणत्याही तिसºया व्यक्तिमुळे झाले नव्हते. तो आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता, असे नीलमने स्पष्ट केले होते.
धर्मेन्द्र यांच्यामुळे अधुरी राहिली ही प्रेमकहाणी
बॉबी व नीलम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र पापा धर्मेंद्र यांना बॉबीचे हे लग्न मान्य नव्हते. सिनेमात काम करणारी मुलगी त्यांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी हे लग्न होऊच दिले नाही. बॉबीने अरेंज मॅरेज करावे, अशी त्यांची इच्छा होते. पित्याच्या इच्छेखातर बॉबी नीलमपासून वेगळा झाला होता, असे म्हणतात.