BIRTHDAY SPECIAL : ऐश्वर्या राय-बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 11:16 IST2016-11-01T11:16:15+5:302016-11-01T11:16:15+5:30
ऐश्वर्या राय-बच्चन हे नाव म्हणजेच एक ब्रँड आहे. गेली दोन दशके हे नाव चाहत्यांच्या मनावर आणि रुपेरी पडद्यावर अधिराज्य ...

BIRTHDAY SPECIAL : ऐश्वर्या राय-बच्चन
ऐ ्वर्या राय-बच्चन हे नाव म्हणजेच एक ब्रँड आहे. गेली दोन दशके हे नाव चाहत्यांच्या मनावर आणि रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. अशा या बॉलीवूड ब्युटी क्वीनचा आज ४३ वा वाढदिवस.
वयाच्या चाळीशीनंतर जेथे कित्येक अभिनेत्रींचे करिअर संपलेले असते तेथे ऐश्वर्या आजही एकाहून एक सरस चित्रपटांत काम करत आहे. आजही ती लीडिंग लेडी म्हणून दिग्दर्शकांची पहिली पसंती असते. लग्न आणि आई झाल्यावरही या ‘मिस वर्ल्ड’चे करिअर जोमात आहे.
बच्चन फॅमिलीची सून आणि एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऐश्वर्याने जे स्थान मिळवले आहे, ते पाहून कोणालाही तिचा हेवा वाटेल. नैसर्गिक सौंदर्याचे उजळ वरदान लाभलेली ही लावण्यवती सोशल मीडियापासून जरा फटाकूनच राहते.
परंतु तिचे जर इन्स्टाग्राम अकाउंट असते तर त्यामध्ये कोणते फोटो तिने शेअर केले असते याचा अंदाज बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानुसार तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दाखवत आहोत असे काही स्पेशल फोटोज् जे तिने कदाचित तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केले असते.
तत्पूर्वी ‘सीएनएक्स मस्ती’कडून तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
![Ash1]()
* मिस वर्ल्ड : १९९४ साली ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकल्यावर झालेला आनंद काय असेल ते वेगळे काही सांगायला नको. हा मुकूट घातलेला फोटो चाहत्यांच्या आठवणींमध्ये नेहमीसाठी कोरला गेलेला आहे.
![Ash11]()
* गॉसिप गर्ल्स : कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘गॉसिप गर्ल’ टीव्ही सिरीज फेम लाईव्हली ब्लेकसोबत काढलेला हा फोटो प्रचंड लोकप्रिय झाला होता.
![Ash Abhishek]()
* डिअर हबी : ऐश्वर्या आणि अभिषेक बॉलीवूडमधील सर्वात चर्चिले जाणारे कपल आहे. त्यांची जोडी नव कलाकारांच्या पीढीतील आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते.
![Ash1d]()
* ऐ दिल... : वयाच्या ४३ व्या वर्षीदेखील एवढे ग्लॅमरस दिसणे केवळ तिलाच जमू शकते. आजच्या अभिनेत्रींनाही ज्युनिअर वाटावी असे तिचे रुप. ‘ऐ दिल है मुश्किल’मधील तिचा लूक आतापर्यंतचा सर्वात सुंदर मानला जात आहे.
![Ash1 baby]()
![Ash1 Babyd]()
* बेबी प्रिन्सेस : अराध्या म्हणजे ऐश्वर्याचा जीव की प्राण. ती जाईल तेथे आपल्या मुलीला सोबत घेऊन जाते. आईच्या सौंदर्याची धनी अराध्यासुद्धा कॅमेऱ्यासमोर तेवढीच सुंदर आणि कॉन्फिडंट असते.
![Ash Friends]()
* मस्ती वुईथ फ्रेंडस् : मैत्रिणींसोबत चीनच्या भींतीवर काढलेला हा फोटो नक्कीच तिच्या वैयक्तिक जीवनातील एका महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार आहे.
![Ash Cannes]()
![Ash Cannesa]()
![Ash Cannes2]()
* कान्स क्वीन : जागतिक चित्रपट महोत्सव ‘कान्स’मध्ये भारताचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व बहुधा ऐश्वर्यानेच केले आहे. कान्स रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याची चर्चा केवळ भारतातच नाही तर विदेशी मीडियामध्येसुद्धा खूप आहे. तिचे ड्रेसेस तर कान्सचा हॉट टॉपिक असतो.
![Ash Family]()
cnxoldfiles/strong> बच्चन कुटूंब बॉलीवूडची रॉयल फॅमिली म्हणून ओळखले जाते. शहंशाह अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पॉवरफूल आणि लोकप्रिय कलाकार आहेत.