वाढदिवसाच्या दिवशीदेखील सोहम शाह करतोय 'या' चित्रपटाचं शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 19:20 IST2019-12-16T19:19:27+5:302019-12-16T19:20:03+5:30
सोहम शाहचा आज वाढदिवस असून सेलिब्रेशन करण्याऐवजी तो शूटिंगमध्ये बिझी आहे.

वाढदिवसाच्या दिवशीदेखील सोहम शाह करतोय 'या' चित्रपटाचं शूटिंग
'शिप ऑफ थिसस', 'तुंबाड', 'बार्ड ऑफ ब्लड' यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता-निर्माता सोहम शाह सध्या खूप व्यग्र आहे. त्याचे त्याच्या चित्रपटातून कामाप्रती असलेली निष्ठा पहायला मिळते. आताचंच पहा ना, त्याचा आज वाढदिवस असून देखील पार्टी किंवा बर्थडे सेलिब्रेशन करण्याऐवजी तो कामात बिझी आहे.
सोहम शाह शेवटचा 'तुंबाड' चित्रपटात पहायला मिळाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या भूमिकेचं खूप कौतूही झालं होतं. सध्या तो अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'द बिग बुल'चे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कुक्की गुलाटी करत आहे.
'द बिग बुल' हा चित्रपट फायनाशियल क्राईम ड्रामा आहे आणि या चित्रपटात तो इंटरेस्टिंग भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा १९९० व २००० दशकात झालेल्या वित्तीय बाजारातील वास्तविक घटनांवर आधारीत आहे.
'तुम्बाड' चित्रपटाचा निर्माता व अभिनेता सोहम शाहने तुम्बाड चित्रपटाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यानुसार बऱ्याच लोकांनी या चित्रपटाचा सीक्वल बनवावा, अशी सूचना केली. त्यांचे म्हणणे मनावर घेतले आणि सीक्वलसाठी आयडिया डेव्हलप केली. आता पटकथा लेखक भेटला की सोहम शाहच्या कल्पेनाला कथेचे रुप मिळेल.
'तुम्बाड २' चित्रपटाची कथा आधीच्या सिनेमापेक्षा वेगळी असणार आहे. मात्र चित्रपटाचा संबंध तुम्बाड या ठिकाणाशी असणार आहे. पहिल्या भागातील काही पात्र दुसऱ्या भागातही पाहायला मिळणार आहेत.