बिप्स-करणच्या लग्नाचे विधी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:32 IST2016-04-08T23:02:24+5:302016-04-28T20:32:43+5:30
बिपाशा अन् करणसिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाची जशी जोरदार चर्चा आहे तशी या लग्नाची जोरदार तयारीही सुरु आहे.

बिप्स-करणच्या लग्नाचे विधी सुरु
ब पाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांच्या लग्नाचे विधी आजपासून सुरु झालेत. आज सकाळी पूजा झाली. त्यानंतर संध्याकाळी संगीत सेरेमनीत बिप्स-करण एकत्र दिसले. पूजेचे काही फोटो बिप्सने सोशल मीडियावर शेअर केलेत. करणनेही बिप्स व त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.‘तुला भेटून माझे स्वप्न पूर्ण झाले’ असे त्याने या फोटोखाली लिहिले आहे. येत्या ३० एप्रिलला म्हणजे येत्या शनिवारी बिप्स व करण लग्नगाठीत अडकणार आहेत. बंगाली पद्धतीने हा विवाह सोहळा होणार आहे. उद्या मेहंदी होणार आहे.
![]()
![]()
लग्नात बिप्स प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेला लाल रंगाचा ड्रेस घालणार आहे.करणच्या ड्रेसचा रंगही बिप्सच्या ड्रेसशी मॅच करणारा असेल. अर्थात दोघांनाही एकमेकांच्या ड्रेसबद्दल माहिती नाही. हे दोघांसाठीही सरप्राईज असेल. लग्नापूर्वीच बिप्स व करणला भेटवस्तू मिळणे सुरु झाले आहे. दोघांचेही फिटनेस ट्रेनर आणि मित्र डियाना व सुजैन दाधीच यांनी दोघांसाठी अनेक भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. बिपाशाने काही दिवसांपूर्वी याची माहिती दिली होती. आम्हा दोघांच्या जवळच्या मित्रांनी महिनाभरात खोली भरून भेटवस्तू खरेदी केल्या आहेत,असे तिने सांगितले होते.
............................................
बिप्स अन् करणची लगीनघाई...
बिपाशा अन् करणसिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाची जशी जोरदार चर्चा आहे तशी या लग्नाची जोरदार तयारीही सुरु आहे. येत्या ३० एप्रिलला बिप्स अन् करणच्या लग्नाचा बार उडणार आहे. या ग्रँड फंक्शनसाठी सध्या बिप्स व करणची तयारी सुरु आहे. विवाह सोहळा अतिशय खासगी असणार असला तरी बिप्स व करण तो अविस्मरणीय बनवू इच्छितात. या सोहळ्यात कुठलीही कसूर राहू नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. तूर्तास तरी हे लव्ह बर्ड्स लग्नाच्या तयारीत गुंतले आहे. आज दोघांनीही स्पा सेशन एन्जॉय केले. यावेळी बिप्स व करण दोघेही अगदी क्युजअल लूकमध्ये दिसले. या दोघांची छायाचित्रे घेण्यासाठी फोटोग्राफर्सची झुंबड उडाली...मग काय, बघायचेत, तर बघा मग...!