​बिपाशा करणार सनी लिओनीचे अनुकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 17:43 IST2016-06-01T12:13:00+5:302016-06-01T17:43:00+5:30

बॉलिवूडची बिंदास गर्ल बिपाशा बसू ही सुद्धा ‘एक्स पॉर्न स्टार’ सनी लिओनी हिचे अनुकरण करताना दिसणार आहे. सनीने जे ...

Bipashaar imitation Sunny Leonei! | ​बिपाशा करणार सनी लिओनीचे अनुकरण!

​बिपाशा करणार सनी लिओनीचे अनुकरण!

लिवूडची बिंदास गर्ल बिपाशा बसू ही सुद्धा ‘एक्स पॉर्न स्टार’ सनी लिओनी हिचे अनुकरण करताना दिसणार आहे. सनीने जे पाऊल उचलले तेच बिपाशाही उचलणार असल्याची बातमी आहे. अलीकडे बिपाशा  करण सिंह ग्रोवरसोबत लग्नगाठीत अडकली. लग्नानंतर बिपाशा सनी लिओनीच्या पाऊलावर पाऊल ठेवेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण बिपाशाने तसाच निर्णय घेतला आहे.



 आता कुठला निर्णय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अलीकडे सनीने चित्रपटांमध्ये किसींग सीन देणे बंद केले आहे. सनीने ‘रागिणी एमएमएस२’ नंतर कुठलाही किसींग सीन दिलेला नाही, असाही दावा केला जातोयं. सनीप्रमाणेच आता बिपाशानेही यापुढे आॅनस्क्रीन किसींग सीन न देण्याचा निर्णय घेतल्याची खबर आहे. किसींग सीन न देण्याच्या अटीवरच बिपाशा चित्रपट साईन करणार असल्याचे कळते. एकेकाळी किसींग सीन चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण मानला जात होता. पण अलीकडे ट्रेंड बदलतोयं. सलमान खानने किसींग सीन देणे बंद केले आहे. याऊपरही त्याचे चित्रपट सुपरहिट ठरत आहे. अशात बिप्सने किसींग सीन न देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात फार काही मोठे नाही. अर्थात यासाठी बिप्सकडे चांगले चित्रपट चालून यायला हवेत!!

Web Title: Bipashaar imitation Sunny Leonei!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.