बिपाशा-करणचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 19:42 IST2018-05-02T14:12:36+5:302018-05-02T19:42:46+5:30

बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोवर सध्या गोवा येथे सुट्या एन्जॉय करीत आहेत. यावेळी त्यांनी त्यांचे काही रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केले आहेत.

Bipasha-Karan looks romantic style; Watch video! | बिपाशा-करणचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; पाहा व्हिडीओ!

बिपाशा-करणचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; पाहा व्हिडीओ!

िनेता करणसिंग ग्रोवर आणि त्याची पत्नी अभिनेत्री बिपाशा बसू सध्या त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहेत. सध्या हे दाम्पत्य गोव्यात असून, त्याठिकाणी चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहेत. करण आणि बिपाशा त्यांच्या या आनंदाचे क्षण चाहत्यांशीही शेअर करीत आहेत. त्याबाबतचे काही व्हिडीओज् आणि फोटो ते सोशल अकाउंटवर शेअर करीत आहेत. या रोमॅण्टिक ट्रीपमध्ये करण आणि बिपाशाचे काही मित्रही त्यांच्यासोबत आहेत. हे सर्व कधी बीचवर डान्स करताना बघावयास मिळत आहेत, तर कधी बिपाशा-करण रोमान्समध्ये आकंठ बुडाल्याचे दिसत आहेत. 
 

करण आणि बिपाशाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज् आणि व्हिडीओज् शेअर केले. ज्यामध्ये दोघेही आपले रोमॅण्टिक क्षण जगत असताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये बिपाशाने पांढºया रंगाचा नी लेंथ कुर्ता घातलेला आहे. तर तिचा पती करण व्हाइट शर्ट आणि केपरीमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये करण आणि बिपाशा मिणमिणत्या दिव्यांमध्ये एका रोमॅण्टिक गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. दुसºया व्हिडीओमध्ये करण-बिपाशासह तिची एक मैत्रीण शेक शेक डान्स करताना दिसत आहे. 
 

तिघेही या व्हिडीओमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. तिसºया व्हिडीओमध्ये करण-बिपाशा त्यांच्या इतर दोन मित्रांसोबत केक कटिंग करताना दिसत आहेत. दरम्यान, करण आणि बिपाशा ३० एप्रिल २०१६ रोजी बंगाली रीतीरिवाजाने लग्नाच्या बंधनात अडकले होते. करण आणि बिपाशा नियमितपणे त्यांचे रोमॅण्टिक फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करीत असतात. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या या फोटोज् आणि व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत असतात. 

Web Title: Bipasha-Karan looks romantic style; Watch video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.