गर्भवती असल्याच्या बातम्यांमुळे वैतागली बिपाशा बसू, अखेर केला ‘हा’ खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 21:49 IST2018-01-17T16:17:44+5:302018-01-17T21:49:42+5:30

३० एप्रिल २०१६ रोजी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसूने अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केले. यानंतर करण आणि ...

Bipasha Basu wonders because of news about being pregnant, finally 'ha' reveals! | गर्भवती असल्याच्या बातम्यांमुळे वैतागली बिपाशा बसू, अखेर केला ‘हा’ खुलासा!

गर्भवती असल्याच्या बातम्यांमुळे वैतागली बिपाशा बसू, अखेर केला ‘हा’ खुलासा!

एप्रिल २०१६ रोजी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसूने अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केले. यानंतर करण आणि बिपाशा त्यांच्या संसारात असे काही व्यस्त झाले, जणू काही त्यांनी बॉलिवूडला गुडबाय केला. असो, सध्या हे दांपत्य एका कारणामुळे भलतेच चर्चेत आहे. होय, चाहत्यांना त्यांच्याकडून गुडन्यूज ऐकायची आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बिपाशा सातत्याने चर्चिली जात आहे. वास्तविक हे दोघे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. सातत्याने त्यांचे फोटोज् ते शेअर करीत असतात. 

मात्र बॉलिवूडच्या या कपलला नुकताच एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला. काही मीडिया रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बिपाशा बसूला काही दिवसांपूर्वी एका रुग्णालयाबाहेर बघण्यात आले. ज्यामुळे हा अंदाज लावला जात आहे की, ती गर्भवती असावी. हे प्रकरण येथेच थांबले नाही, तर बिपाशाचा एक फोटो एडिट करून ती खरोखरच गर्भवती असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली. त्यानंतर बिपाशाच्या गर्भावती असण्यावरून नेटिझन्समध्ये एकच चर्चा रंगली. जेव्हा ही चर्चा बिपाशापर्यंत पोहोचली तेव्हा ती प्रचंड संतापली. अखेर तिने याबाबतचा सोशल मीडियावर खुलासा करून अशा प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 



बिपाशाने ट्विट करून याबाबतचा खुलासा करताना लिहिले की, ‘आता पुन्हा एकदा पहिल्यासारखेच होत आहे. मी माझी बॅग घेऊन कारमध्ये बसत होती, तेव्हा काही मीडियावाल्यांनी मी गर्भवती असल्याच्या बातम्या देण्यास सुरुवात केली. मित्रांनो, मी गर्भवती नाही. या सर्व बातम्यांमुळे मी खरोखरच त्रस्त झाले आहे.’ बिपाशासोबत असे पहिल्यांदाच घडले नाही, तर याअगोदरही बिपाशा गर्भवती असल्याच्या चर्चा पसरविण्यात आल्या आहेत. त्यावेळीदेखील बिपाशाने अशा प्रकारची पोस्ट टाकून या अफवांना पूर्णविराम दिला होता. 

Web Title: Bipasha Basu wonders because of news about being pregnant, finally 'ha' reveals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.