बिपाशा बासूने शेअर केला नो-मेकअप लूकमधील फोटो, ट्रोलर्सनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 12:19 IST2020-05-25T12:08:18+5:302020-05-25T12:19:29+5:30
बिपाशाचा हा फोटो पाहून ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

बिपाशा बासूने शेअर केला नो-मेकअप लूकमधील फोटो, ट्रोलर्सनी साधला निशाणा
लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री बिपाशा बासूने आपला बिना मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत खास करुन तेचे केस पांढरे होताना दिसतायते. बिपाशाच्या या फोटोला संमिश्र प्रतिसाद येतोय. काहींना बिपाशाचा नो-मेकअप लूक आवडला आहे तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही ट्रोलर्स तिला सतत ती म्हातारी झाली आहे अशी कमेंट करत असतात.
बिपाशाचा हा फोटो पाहून तिने जीम केल्यानंतर हा काढला असावा असा अंदाज लावला जातोय. बिपाशा जीममध्ये अनेक तासा घाम गाळत असते. बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर आपल्या फिटनेस फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी दोघांचा एका नवजात बाळासोबतचे फोटो तुफान व्हायरल झाला होता. या फोटोंमध्ये करणसिंगच्या हातात बाळ आहे आणि बिपाशाच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. ‘हेट स्टोरी’ फेम अभिनेता विवान भटेना याचे हे बाळ होते. बिपाशा आणि करणचा हा फोटो जून 2019मध्ये काढलेला होता.
बिपाशा व करणबद्दल सांगायचे तर दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते. करणचे हे तिसरे लग्न होते. सध्या बिप्स व करण दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. दोघेही रोमॅन्टिक लाईफ जगत आहेत.