'वो कौन थी' सिनेमाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 17:33 IST2018-09-11T17:18:29+5:302018-09-11T17:33:29+5:30
1964 साली आलेल्या मनोज कुमार आणि साधना यांच्या 'वह कौन थी'चा रिमेक करण्याचे काम सुरू आहे, असे समजते आहे आणि या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल ऍक्ट्रेस आणि बंगाली बाला बिपाशा बासू लवकरच दिसण्याची शक्यता आहे.

'वो कौन थी' सिनेमाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री
बऱ्याच कालावधीपासून 1964 साली रिलीज झालेला मनोज कुमार व साधना यांचा सुपरहिट ठरलेला 'वो कौन थी' या चित्रपटाचा रिमेक बनणार असल्याची चर्चा सुरू होती आणि या रिमेकमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र सूत्रांकडून माहिती मिळते आहे की ऐश्वर्याऐवजी या सिनेमात अभिनेत्री बिपाशा बासू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याने स्वतः हा प्रोजेक्ट सोडल्याचे समजते आहे.
1964 साली आलेल्या मनोज कुमार आणि साधना यांच्या 'वह कौन थी'चा रिमेक करण्याचे काम सुरू आहे, असे समजते आहे आणि या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल ऍक्ट्रेस आणि बंगाली बाला बिपाशा बासू लवकरच दिसण्याची शक्यता आहे. या लीड रोलमध्ये ऐश्वर्या रॉय दिसणार अशी चर्चा सुरू होती. मात्र काही कारणाने हे समीकरण जुळले नाही. आता या रोलसाठी बिपाशा बासूचे नाव निश्चित झाले असल्याचे समजते आहे. या रिमेकच्या चित्रीकरणाला 10 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे.
'वह कौन थी'चा रिमेक असला तरी मूळ कथानकामध्ये यावेळी बरेच बदल केले जाणार आहेत. यावेळी बिपाशा बासू बरोबर अर्जुन एन. कपूर आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. अर्जुन कपूरने आतापर्यंत प्रोडक्शनमध्ये बरेच काम केले आहे. त्याने प्रेरणा अरोराच्या बरोबर मिळून बऱ्याच सिनेमांचे प्रोडक्शन केले आहे. जुन्या 'वह कौन थी'मध्ये मनोज कुमार आणि डबल रोलमध्ये साधना होती. एन.एन. सिप्पींच्या प्रॉडक्शनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केले होते. त्यातील सस्पेन्स, थ्रील आणि संगीत अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या रिमेकची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.