लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 04:39 PM2023-05-30T16:39:07+5:302023-05-30T17:12:01+5:30

बिपाशा आणि करणने आपल्या लाडक्या लेकीसाठी महागडी कार खरेदी केली आहे.

Bipasha basu karan singh grover buys new audi q7 worth rs 92 lakh for daughter devi | लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली...

लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहावर्षनंतर बिपाशा आई झाली. करण सिंग ग्रोवर आणि बिपाशाला गतवर्षी १२ नोव्हेंबरला कन्यारत्न झालं. त्यांनी आपल्या लेकीचे नाव ‘देवी’ असे ठेवले आहे. 

बिपाशा बसू सध्या अभिनयापासून दूर आहे. मात्र अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक क्षणी तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या कार कलेक्शनमध्ये नवीन ऑडी Q7 अॅड केली आहे. याचा एक व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बिपाशा आणि करण त्यांची नवीन कारसोबत खूप आनंदी दिसत आहेत. या  व्हिडिओवर त्यांचे चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बिपाशा बसूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन कारचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती करण सिंग ग्रोवरसोबत Audi Q7 ची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. कार घेण्यापूर्वी या कपलने केक कापून आनंद साजरा केला. या व्हिडिओमध्ये बिपाशाने पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या शर्टसोबत व्हाइट जीन्स घातली आहे. तर करण व्हिडिओमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना बिपाशाने लिहिले की – 'देवीची नवी राईड...दुर्गा दुर्गा... बिपाशाच्या या व्हिडिओवर तिचे चाहते कमेंट्सद्वारे अभिनेत्रीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. काही वेळातच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.  बिपाशाच्या या लक्झरी कारची किंमत सुमारे 92 लाख रुपये आहे.

2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
 

Web Title: Bipasha basu karan singh grover buys new audi q7 worth rs 92 lakh for daughter devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.