​बिपाशा बासू का लपवतेय तिचा चेहरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 09:52 IST2017-09-02T04:22:04+5:302017-09-02T09:52:04+5:30

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे सगळ्यात जास्त मीडिया फ्रेंडली कपल आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ...

Bipasha Basu is hidden in her face? | ​बिपाशा बासू का लपवतेय तिचा चेहरा?

​बिपाशा बासू का लपवतेय तिचा चेहरा?

पाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे सगळ्यात जास्त मीडिया फ्रेंडली कपल आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ते नेहमीच मीडियाला फोटोंसाठी पोझेस देत असतात. तसेच त्यांच्या सगळ्या बातम्या मीडियापर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे बिपाशा आणि करण हे मीडियामधील मंडळींचे देखील आवडते कपल आहे. पण या कपलच्या वागणुकीमुळे मीडियातील लोकांना नुकताच चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बिपाशा आणि करण दोघे नुकतेच रॉकी एस या त्यांच्या डिझायनर मित्राच्या घरी एका पार्टीसाठी गेले होते. पार्टीतून बाहेर पडल्यावर करण आणि बिपाशा नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्सना पोझेस देणार असे सगळ्यांना वाटत होते. पण करण आणि बिपाशाचा एक वेगळाच चेहरा मीडियाच्यासमोर आला. बिपाशा कधी नव्हे तर मीडियापासून तिचा चेहरा लपवत होती आणि करणने देखील मीडियाला पोज देण्याऐवजी गाडीतून पळ काढला. बिपाशाने चेहरा लपवण्यासाठी त्यावर एक पुस्तक देखील ठेवले होते. बिपाशा अशी का वागतेय हे कोणालाच कळच नव्हते. पण डेक्कल क्रोनिकल या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार बिपाशाने नुकतीच चेहऱ्यावर सर्जरी केली आहे. ती सर्जरी कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ती चेहरा लपवत होती.
बिपाशा आणि करण काही दिवसांपूर्वी एका पार्टीत दिसले होते. त्यावेळी बिपाशा एकदम व्यवस्थित होती. तिच्या चेहऱ्यात काहीही बदल दिसत नव्हता. त्यामुळे बिपाशाची ही बातमी खरी आहे की खोटी यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. बिपाशाचा मूड चांगला नसेल असे काहींचे म्हणणे आहे. आता ही बातमी खरी आहे की खोटी हे केवळ बिपाशाच तिच्या चाहत्यांना सांगू शकेल. 

Also Read :  करिना कपूरने ‘काली बिल्ली’ म्हणत बिपाशा बासूच्या लगावली कानशिलात!

Web Title: Bipasha Basu is hidden in her face?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.