Bipasha Basu: बिपाशा बासूने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:51 IST2022-11-26T13:51:05+5:302022-11-26T13:51:28+5:30
Bipasha Basu : १२ नोव्हेंबर रोजी आई-वडील झाल्यानंतर लगेचच बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या मुलीचा जन्म आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते.

Bipasha Basu: बिपाशा बासूने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो झाला व्हायरल
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांच्यासाठी २०२२ हे वर्ष खूप खास ठरले आहे. १२ नोव्हेंबरला लग्नाच्या सहा वर्षांनी करण आणि बिपाशाच्या घरी एका छोट्या राजकुमारीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतरच अभिनेत्रीने लेकीचं नाव देवी ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर बाळाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत आता बिपाशा बसूने तिची मुलगी 'देवी'चा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
१२ नोव्हेंबर रोजी आई-वडील झाल्यानंतर लगेचच बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या मुलीचा जन्म आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते. आपल्या आयुष्यात मुलीचे स्वागत करताना दोघेही खूप खूश आहेत. या नव्या प्रवासात दोघांच्याही आनंदाला पारावर नाही. बिपाशाची मुलगी 'देवी'ची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत आज अभिनेत्रीने तिची मुलगी देवीची पहिली झलक जगाला दाखवली आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर बिपाशाने देवीचा एक फोटो शेअर केला, तिचा चेहरा हार्ट इमोजीने लपवला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत, करण सिंग ग्रोव्हर आपल्या लेकीला हातात धरून बसलेला दिसत आहे, तर बिपाशा बासू देवीकडे प्रेमाने पाहत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने एक गोंडस कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले की, 'स्वीट बेबी एंजेल बनवण्याची आमची रेसिपी...अर्धा कप तू आणि अर्धा कप मी...अर्धा कप आईचे खूप प्रेम आणि आशीर्वाद...इंद्रधनुष्याचे ३ थेंब त्यानंतर गोंडसपणा आणि स्वादिष्टपणाची चाचणी.' बिपाशाने शेअर केलेला तिच्या मुलीचा हा पहिला फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे चाहते देवीच्या फोटोवर प्रेम व्यक्त करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये लोक हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया देत आहेत.