पेहचान कौन? ‘बिग बॉस ओटीटी’ विनरचा हा अवतार पाहून बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 10:55 IST2021-09-28T10:55:16+5:302021-09-28T10:55:57+5:30

जाड फ्रेमचा चष्मा, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पांढरे केस अशा अवतारातील हा वृद्ध पुरूष नसून एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे...

bigg boss ott winner divya agarwal shocking transformation into old man look for cartel series | पेहचान कौन? ‘बिग बॉस ओटीटी’ विनरचा हा अवतार पाहून बसेल धक्का 

पेहचान कौन? ‘बिग बॉस ओटीटी’ विनरचा हा अवतार पाहून बसेल धक्का 

ठळक मुद्देदिव्या अग्रवालने अलीकडे ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो जिंकला. दिव्या ख-या आयुष्यात अतिशय बोल्ड आहे.

पडद्यावर भूमिका जिवंत करण्यासाठी कलाकारांना काय काय करावं लागतं, याची कल्पना तुम्हाला हा फोटो पाहिल्यानंतर पाहून येईल. होय, एका वृद्धाच्या लुकमधील एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.  हा वृद्ध पुरूष नसून महिला आहे, हे सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.पण हे खरं आहे. जाड फ्रेमचा चष्मा, चेह-यावर सुरकुत्या आणि पांढरे केस अशा अवतारातील हा वृद्ध पुरूष नसून एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिचा हा लुक थक्क करणारा आहे. अगदी या लुकमध्ये तिला ओळखणेही कठीण आहे. ही कोण? हे अद्यापही तुम्ही ओळखू शकला नसाल तर ही ‘बिग बॉस ओटीटी’ची (Bigg Boss OTT) विजेती आहे. होय, ही ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल  (Divya Agarwal) आहे.

नुकतीच एमएक्स प्लेअर व ऑल्ट बालाजीवर ‘कार्टेल’ (Cartel) ही नवी वेबसीरिज रिलीज झाली आहे. या क्राईम ड्रामा सीरिजचे एकूण 14  एपिसोड आहेत. याच सीरिजमधील स्वत:चा लुक दिव्याने शेअर केला आहे. 

‘कार्टेल पाहिल्यानंतरचा माझा मूड... कार्टेलच्या यशासाठी बालाजीच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करण्याची संधी मिळाली नाही. हा शो शानदार आहे. एकता कपूर मॅम तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल तुमचे आभार. ही भूमिका म्हणजे अभिनयाप्रतीचे माझे प्रेम आणि पॅशन आहे. मेकअपसाठी तासन् तास चेअरवर बसून मी स्वत:चं सर्वोत्तम व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न केला आहे, ’ असे तिने हा लुक शेअर करताना लिहिलं आहे.

तिचा हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत. दिव्या अग्रवालने अलीकडे ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो जिंकला. दिव्या ख-या आयुष्यात अतिशय बोल्ड आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही तिचा हाच अंदाज पाहायला मिळाला होता.

Web Title: bigg boss ott winner divya agarwal shocking transformation into old man look for cartel series