Bigg Boss OTT: त्याच्या खिशात दिव्याचं लिपबाम...; मग काय? शमितानं घेतला राकेशचा क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:20 PM2021-09-01T16:20:00+5:302021-09-01T16:20:44+5:30

Bigg Boss OTT: होय, राकेशच्या खिशात दिव्या अग्रवालचं लिपबाम सापडलं आणि शमिताचा पारा चढला. पाहा Video

Bigg Boss OTT: Shamita Shetty gets furious as Divya Agarwal's lip balm falls from Raqesh Bapat's pocket | Bigg Boss OTT: त्याच्या खिशात दिव्याचं लिपबाम...; मग काय? शमितानं घेतला राकेशचा क्लास

Bigg Boss OTT: त्याच्या खिशात दिव्याचं लिपबाम...; मग काय? शमितानं घेतला राकेशचा क्लास

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी राकेश शमिताचे पाय चेपताना दिसला होता. किचनची ड्युटी करून शमिता थकली होती. त्यामुळे त्याने तिचे पाय चेपले होते. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

बिग बॉस ओटीटी’मध्ये (Bigg Boss OTT) सध्या चर्चा आहे ती फक्त दोन स्पर्धकांची. ते कोण तर शमिता शेट्टी (Shamita Shetty)आणि राकेश बापट (Raqesh Bapat). बिग बॉसच्या घरातील या दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे. सकाळी उठल्या उठल्या शमिताला किस करणे, दिवसभर तिची काळजी घेणे अन् अगदी रात्रीला तिचे पाय चेपून देण्यापर्यंतच्या एक ना अनेक गोष्टी राकेश बापट करताना दिसतोय. एकीकडे राकेश शमिताची काळजी घेतोय तर शमिता त्याच्यासाठी अगदी काहीही करायला तयार आहे. पण अलीकडे असं काही घडलं की, शमिता भलतीच संतापली. होय, राकेशच्या खिशात दिव्या अग्रवालचं लिपबाम सापडलं आणि शमिताचा पारा चढला.

त्याचं झालं असं की, बिग बॉस ओटीटीचे सर्व स्पर्धक लिविंग एरियामध्ये बसलेले होते. याचदरम्यान अचानक राकेशच्या खिश्यातील लिप बाम खाली पडलं. आधी तर ते शमिताचं आहे, असंच सर्वांना वाटलं. मग काय सर्वजण राकेशला चिडवू लागलेत. यावर हे लिपबाम शमिताचं नसून दिव्याचं आहे, असं राकेशनं सांगितलं. त्याचे हे शब्द ऐकून क्षणात शमिताच्या चेह-यावरचे हावभाव बदलले. तिचा पारा चढला. मग काय, राकेशचा चांगलाच क्लास झाला. तू दिव्याचं लिपबाम घेतलंच का? शमिता शेट्टीकडं मेकअपची कमतरता आहे का? असं शमिता रागारागात त्याला बोलताना दिसली. मला जे लोक आवडतात, त्यांच्याबद्दल मी प्रचंड पजेसिव्ह आहे, हे सांगायलाही ती विसरली नाही. राकेश शमिताला समजवण्याचा प्रयत्न करत राहिला. तिचा राग निवळावा म्हणून शमिताच्या गालावर किस करतानाही दिसला. पण शमिता मात्र लिपबाम काही केल्या विसरता येईना...

 काही दिवसांपूर्वी राकेश शमिताचे पाय चेपताना दिसला होता. किचनची ड्युटी करून शमिता थकली होती. त्यामुळे त्याने तिचे पाय चेपले होते. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. पहिल्या आठवड्यात शमिता व राकेश यांच्या वारंवार खटके उडाले होते. परंतु दुस-या आठवड्यात दोघांत असे काही ट्युनिंग जमू लागले की, आता राकेश व शमिता दोघेही एकमेकांसोबतच दिसतात. अगदी एकमेकांशिवाय दोघांचे पानही हलत नाही. अगदी पर्सनल लाईफमधील गोष्टी शेअर करण्यापासून तर टास्कमध्ये एकमेकांना सोबत देण्यापर्यंत दोघांतही जबदस्त बॉन्डिंग दिसून येतेय.

Web Title: Bigg Boss OTT: Shamita Shetty gets furious as Divya Agarwal's lip balm falls from Raqesh Bapat's pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.