'बिग बॉस' फेम हिना खानचा ग्लॅमरस अंदाज, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 19:00 IST2019-03-22T19:00:00+5:302019-03-22T19:00:00+5:30
'कसौटी जिंदगी की २' मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खानला नुकतेच बेस्ट अॅक्टर निगेटिव्ह पॉप्युलर व जुरी चॉइस या दोन इंडियन टेली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'बिग बॉस' फेम हिना खानचा ग्लॅमरस अंदाज, See Photos
'कसौटी जिंदगी की २' मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खानला नुकतेच बेस्ट अॅक्टर निगेटिव्ह पॉप्युलर व जुरी चॉइस या दोन इंडियन टेली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे सध्या हिना खूपच खूश आहे. या पुरस्कार सोहळ्यात हिना खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली.
हिनाने या सोहळ्यात लिना मानेने डिझाईन केलेला थाई-हाई स्लिट गाऊन परीधान केला होता. वन शोल्डर गाऊन मल्टी कलर होता. त्यासोबत हिनाची ईअररिंग्स व स्टायलिश रिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. या आऊटफिटमध्ये हिना खूपच हॉट व ग्लॅमरस दिसत होती.
हिना खान सोशल मीडियावर सक्रीय असून ती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. सध्या ती स्टार प्लस वाहिनीवरील 'कसौटी जिंदगी की २' मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र ती ही मालिका सोडणार असल्याचे बोलले जात आहे.
एप्रिलनंतर हिना मालिकेत दिसणार नसल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यानंतर ती बॉलिवूड प्रोजेक्टवर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती दिग्दर्शक विक्रम भट यांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा महिला केंद्रीत चित्रपट असणार आहे.
हिनाने आपल्या करियरची सुरूवात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेपासून केली होती. त्यानंतर ती रिएलिटी शो बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमधून ती खूप लोकप्रिय झाली. 'बिग बॉस'मध्ये ती तिच्या स्टाईल स्टेंटमुळे नेहमी चर्चेत असायची.