'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 20:30 IST2019-03-14T20:30:00+5:302019-03-14T20:30:00+5:30
मागील वर्षी ती फिटलूक मासिकाच्या कव्हर फोटोवर झळकली होती. या मासिकाचे संस्थापक मोहित कथुरिया यांना ती नुकतीच भेटली. त्यावेळी तिने या शूटवेळीच्या आठवणींना उजाळा दिला.

'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा
अभिनेत्री हिना खान 'बिग बॉस'च्या ११ व्या सीझनमधून घराघरात पोहचली. त्यानंतर तिचे फॅन फॉलोविंग वाढले. ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. इतकेच नाही तर सोशल मीडियावर ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. मागील वर्षी ती फिटलूक मासिकाच्या कव्हर फोटोवर झळकली होती. या मासिकाचे संस्थापक मोहित कथुरिया यांना ती नुकतीच भेटली. त्यावेळी तिने या शूटवेळीच्या आठवणींना उजाळा दिला.
हिना म्हणाली की,' मोहित हा खूप मेहनती माणूस आहे आणि तिला मोहितच्या मॅगझिन कव्हरवर काम करायला खूप मजा आली.'
हिनाने जो ड्रेस घातला होता तो तिला खूपच आवडला. त्याशिवाय हिनाने हेही सांगितले की मोहित आणि ती या दोघांमध्ये बरेच साम्य आहे आणि ते म्हणजे दोघे फिटनेस फ्रिक आहेत.
तर मोहित म्हणाला की,' आम्ही दोघे फिटनेस फ्रिक आहोत आणि आम्ही आमच्या फिटनेसकडे गांभीर्याने पाहतो. आम्ही वर्कआउट करतो. कितीही व्यस्त शेड्युल असेल तरीदेखील आम्ही व्यायामासाठी वेळ काढतो.'