लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅनचा स्वॅग पुन्हा एकदा दिसणार; चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 19:46 IST2023-11-02T19:44:30+5:302023-11-02T19:46:05+5:30

एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे. आता एमसी स्टॅन गायनातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Bigg Boss 16 winner MC Stan makes Bollywood playback singing debut with Salman Khan's niece's film | लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅनचा स्वॅग पुन्हा एकदा दिसणार; चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅनचा स्वॅग पुन्हा एकदा दिसणार; चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे. भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे.  'बिग बॉस 16' चा तो विजेता ठरला होता.  या शोमध्ये त्याला खूप पसंती मिळाली होती. आता एमसी स्टॅन गायनातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'फर्रे' या चित्रपटातून तो डेब्यू करत आहे. ही आनंदाची बातमी एमसी स्टॅनने चाहत्यांना इन्स्टा स्टोरीवरुन दिली. 

सुपरस्टार सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री ही देखील 'फर्रे'या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अलिजेह व्यतिरिक्त या चित्रपटात साहिल मेहता, रोनित बोस रॉय, जुही बब्बर, झेन शॉ सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


एम सी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो दर महिन्याला लाखो रुपये कमावतो. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एमसीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.  पण तरीही त्याने त्याची आवड जोपासली. आज त्याची गाणी लोकप्रिय झाली असून तो सध्या एक प्रसिद्ध रॅपर आहे. बिग बॉसच्या घरात त्याच्या गळ्यात दीड कोटींची चेन आणि ८० हजाराचे शूज घालून फिरल्याने तो चांगलाच चर्चेत आला होता. 

Web Title: Bigg Boss 16 winner MC Stan makes Bollywood playback singing debut with Salman Khan's niece's film