थंडबस्त्यात नाही गेला प्रियंका-आलिया-कतरिनाचा 'जी ले जरा', मोठी अपडेट आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:48 IST2025-12-03T12:44:14+5:302025-12-03T12:48:01+5:30
Jee Le Zaraa Movie : 'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच प्रियांका चोप्रा, आलिया भट आणि कतरिना कैफ एकत्र काम करणार होत्या. काही कारणास्तव हा चित्रपट बनण्यासाठी वेळ लागत होता. आता या सिनेमावर मोठी अपडेट समोर आली आहे.

थंडबस्त्यात नाही गेला प्रियंका-आलिया-कतरिनाचा 'जी ले जरा', मोठी अपडेट आली समोर
'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच प्रियांका चोप्रा, आलिया भट आणि कतरिना कैफ एकत्र काम करणार होत्या. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काही ना काही कारणांमुळे अडथळे येत राहिले. त्यामुळे आता हा चित्रपट बनणार नाही, असे तर्कवितर्क लावले जात होते. पण आता या अफवांवर खुद्द चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तरने प्रतिक्रिया देऊन त्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, फरहान लवकरच आपला आगामी चित्रपट 'जी ले जरा'वर काम सुरू करणार आहे. तो म्हणाला की, तो अजूनही या प्रोजेक्टवर काम करत आहे. त्याने हे मान्य केले की, काही व्यग्र वेळापत्रकांमुळे तो या प्रोजेक्टकडे लक्ष देऊ शकला नव्हता, त्यामुळे ते थांबवण्यात आले होते. पण आता तो पुन्हा यावर काम सुरू करेल. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, फरहान 'जी ले जरा'साठी खूप उत्सुक होता. मात्र, तिन्ही अभिनेत्रींच्या तारखा न जुळल्यामुळे ते खूप चिंतेत होते. आता मात्र, सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, अशी कबुली फरहानने दिली आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर या चित्रपटावर काम सुरू करेल.
यामुळे झाला चित्रपटाला विलंब
'जी ले जरा' चित्रपट बनण्यास झालेल्या विलंबाची अनेक कारणे आहेत. हा चित्रपट तीन मुख्य अभिनेत्री असलेला चित्रपट असून यात प्रियंका चोप्रा, आलिया भट आणि कतरिना कैफ या तिघींना एकत्र कास्ट करणे हे फरहानसाठी मोठे आव्हान होते. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मालती मेरी जोनासच्या जन्मानंतर प्रियंकाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. तर आलिया भट आणि कतरिना कैफ इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्याने या चित्रपटावर लक्ष केंद्रित करू शकल्या नव्हत्या.