बिग बींचा परिसस्पर्शाने कवडीमोल स्कूटर झाली कोट्यवधीची !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 12:13 IST2016-05-30T06:42:48+5:302016-05-30T12:13:41+5:30
कोलकातामधील सुजीत नारायण सूर यांच्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन एखाद्या अल्लादिनच्या जिनीपेक्षा कमी नाहीत. कारण महानायकाच्या परिसस्पर्शानं कवडीमोल स्कूटरला ...

बिग बींचा परिसस्पर्शाने कवडीमोल स्कूटर झाली कोट्यवधीची !
>कोलकातामधील सुजीत नारायण सूर यांच्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन एखाद्या अल्लादिनच्या जिनीपेक्षा कमी नाहीत. कारण महानायकाच्या परिसस्पर्शानं कवडीमोल स्कूटरला कोट्यवधी होण्याचा मान मिळालाय. आगामी 'तीन' या सिनेमात बिग बी ज्या निळ्या स्कूटरवर फिरताना दिसतायत ती स्कूटर सुजीत नारायण सूर यांची आहे. गेल्या 13 वर्षापासून ते ही सेकंड हँड स्कूटर वापरत होते. 'तीन' सिनेमाच्या युनिटकडून शूटिंगसाठी या स्कूटरची मागणी करण्यात आली. त्यावेळी या स्कूटरचं नशीब इतकं पालटेल अशी कल्पनाही सुजीत यांना नव्हती. मात्र 'तीन'च्या प्रोमोमध्ये बिग बी चालवत असलेली स्कूटर सुजीत याची असल्याचं समजताच ती खरेदी करण्यासाठी बोली लागू लागलीय. एकाने तर एक कोटी रुपये देऊन ही स्कूटर खरेदी करण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र सुजीत यांनी नकार दिला. आता सुजीत ही स्कूटर आणि बिग बींचा स्कूटरवरील फोटो आपल्या घरातच नाही तर हृदयात जपून ठेवणार आहेत.
![]()