बीग बीं मुळे आदिती आनंदित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:25 IST2016-01-16T01:06:04+5:302016-02-05T08:25:17+5:30
आदिती राव हैदरी तिचा आगामी चित्रपट 'वझीर' मध्ये उत्तम नृत्यांगणा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट म्हणजे इमोशनल ड्रामा असून ...

बीग बीं मुळे आदिती आनंदित
आ िती राव हैदरी तिचा आगामी चित्रपट 'वझीर' मध्ये उत्तम नृत्यांगणा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट म्हणजे इमोशनल ड्रामा असून सर्वजण विचार करतात तसा थ्रिलर नाही. आदिती राव हैदरी ही फरहान अख्तर आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक बेजॉय नाम्बियार यांनी नील नितीन मुकेश आणि जॉन अब्राहम यांनाही निवडले आहे. चित्रपट ८ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. आदिती तिच्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली,' रूहाना अली यांची भूमिका मी करत आहे. ती सुंदर आणि उत्तम नृत्यांगणा आहे. हा रोल अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असून अमिताभ बच्चन यांना जेव्हाही मी सेटवर पाहायचे तेव्हा मला फार आनंद व्हायचा. त्यांच्याकडून बरंच काही शिकायलाही मिळायचे.