बिग बी म्हणतात, माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 17:29 IST2017-03-02T07:20:49+5:302017-03-02T17:29:22+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांना ओळखणार नाही, असे कुणीही नसावे. केवळ हरहुन्नरी अभिनेता यासोबतच एक संयमी, संपन्न व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ...

Big B says, after my death my property ...! | बिग बी म्हणतात, माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती...!

बिग बी म्हणतात, माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती...!

ानायक अमिताभ बच्चन यांना ओळखणार नाही, असे कुणीही नसावे. केवळ हरहुन्नरी अभिनेता यासोबतच एक संयमी, संपन्न व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय राहणारे अमिताभ  कायम समाजाला वेगवेगळे संदेश देत असतात. आत्ताही महिला दिनाच्या तोंडावर अमिताभ यांनी स्त्री-पुरूष समानतेवर एक सुंदर संदेश समाजाला दिला आहे.
. स्त्री-पुरुष समानतेवर अमिताभ यांनी एक tweet केले आहे. ‘ माझ्या मृत्यूनंतर माझी जी काही संपत्ती असेल ती, माझी मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांच्यात समान वाटण्यात येईल, असे tweet त्यांनी केले आहे. सोबतच एक फोटो पोस्ट केला आहे. या tweetला त्यांनी  लैंगिक समानता (#genderequality), आपण सर्व समान आहोत (#WeAreEqual) हे हॅशटॅग दिले आहेत.  आपल्या या tweetमधून अमिताभ यांनी लिंग समानतेचे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.
 


 भारतासारख्या देशात  परंपरेनुसार वडिलांची संपूर्ण संपत्ती त्यांच्या पश्चात्त मुलाला दिली जाते. त्याअर्थाने बिग बी यांनी घेतलेला निर्णय निश्चितपणे कौतुकास्पद आणि समाजाला एक वेगळी दिशा दाखवणारा आहे.  अमिताभ यांना श्वेता नंदा आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत. 

सध्या अमिताभ रामगोपाल वर्मा सध्या ‘सरकार3’मध्ये बिझी आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. लवकरच याचे ट्रेलरही आपल्याला पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आणि ‘ड्रॅगन’च्या शूटींगमध्येही अमिताभ बिझी आहेत.  अलीकडे  अमिताभ बच्चन यांना क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांनी बकिंगहम पॅलेसचे निमंत्रण मिळाले होते. बकिंगहम पॅलेसमध्ये होणाºया भारत ब्रिटीश सांस्कृतिक कार्यक्रमात बिग बींनी सहभागी व्हावे, असे ९० वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीय यांची इच्छा होती. पण अमिताभ यांनी हे निमंत्रण नाकारले. काही पूर्व नियोजित कमिटमेंटमुळे अमिताभ या भव्य सोहळ्याला जाऊ शकणार नाहीयेत. त्यामुळे अमिताभ यांनी याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. अर्थात सोशल मिडीयावर अमिताभ यांनी याबद्दल कोणतीच माहिती अद्याप दिलेली नाही.

Web Title: Big B says, after my death my property ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.