बेफिक्रे गर्ल वाणी कपूरने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 13:22 IST2018-03-15T16:32:24+5:302018-03-16T13:22:30+5:30

अभिनेता रणवीर सिंगसोबत ‘बेफ्रिके’ या चित्रपटात बघावयास मिळालेली अभिनेत्री वाणी कपूर हिने नुकतेच एक नवे आणि अतिशय बोल्ड फोटोशूट ...

Biffrey Girl Wani Kapoor made bold photoshoot, see photo! | बेफिक्रे गर्ल वाणी कपूरने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो!

बेफिक्रे गर्ल वाणी कपूरने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो!

िनेता रणवीर सिंगसोबत ‘बेफ्रिके’ या चित्रपटात बघावयास मिळालेली अभिनेत्री वाणी कपूर हिने नुकतेच एक नवे आणि अतिशय बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये वाणी खूपच बोल्ड लूकमध्ये बघावयास मिळत आहे. वास्तविक हे फोटोशूट तिने ‘मॅक्झिम’ या मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी केले आहे. वाणीने यशराज बॅनरच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ज्यामध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्यासह अभिनेत्री परिणिती चोपडा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पुढे २०१६ मध्ये तिने ‘बेफिक्रे’ या चित्रपटातून कमबॅक केले. 



वाणीने टूरिझम या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने हॉटेल इंडस्ट्री ज्वाइन केली होती. हॉटेलमध्ये काम करतानाच तिला बºयाचशा मॉडलिंगसाठी आॅफर्स आल्या. त्यानंतर तिने मॉडलिंग क्षेत्रात नशीब आजमाविले. 





पुढे मॉडलिंग करताना तिला बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर्स आल्या. तिने आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले, मात्र अद्यापपर्यंत तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. चित्रपटातील किसिंग सीन्समुळे ती चांगलीच चर्चेत आली. ‘बेफिक्रे’नंतर तर तिला किसिंग गर्ल या नावानेही ओळखले जात आहे. 





दरम्यान, सध्या वाणीकडे एकाही चित्रपटाची आॅफर नाही. परंतु ती सातत्याने लाइमलाइटमध्ये राहण्याचा प्रयत्न करीत असते. बॉलिवूडमधील बºयाचशा इव्हेंटमध्ये ती बघावयास मिळाली आहे. काही काळापूर्वी ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करताना बघावयास मिळाली होती. 

Web Title: Biffrey Girl Wani Kapoor made bold photoshoot, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.