भूमी पेडणेकर करणार शाहरूख खानसोबत या चित्रपटात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 08:00 IST2018-09-24T13:42:48+5:302018-09-25T08:00:00+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी सिनेमा 'सॅल्यूट'ला अखेर नायिका मिळाली. या चित्रपटात शाहरूखच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे.

Bhumi Pednekar working with Shahrukh Khan in Salute | भूमी पेडणेकर करणार शाहरूख खानसोबत या चित्रपटात काम

भूमी पेडणेकर करणार शाहरूख खानसोबत या चित्रपटात काम

ठळक मुद्दे 'सॅल्यूट'मध्ये भूमी पेडणेकर दिसणार मुख्य भूमिकेतभूमी पेडणेकर निभावणार शाहरूख खानच्या पत्नीची भूमिका

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी सिनेमा 'सॅल्यूट'ला अखेर नायिका मिळाली. या चित्रपटात शाहरूखच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे.

शाहरूख खानचा आगामी चित्रपट 'सॅल्यूट'साठी नायिकेचा शोध बऱ्याच कालावधीपासून सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी बऱ्याच अभिनेत्रींची नावे समोर आली. त्यात प्रियांका चोप्रापासून वाणी कपूर अशा लीडच्या अभिनेत्रींच्या नावावर चर्चा झाली. मात्र आता अभिनेत्री भूमी पेडणेकरची 'सॅल्यूट' चित्रपटासाठी वर्णी लागल्याचे समजते आहे.
'सॅल्यूट' चित्रपटातून पहिल्यांदा भूमी पेडणेकर शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात ती शाहरूखच्या पत्नीची भूमिका करताना दिसणार आहे. भूमी पेडणेकरला या चित्रपटासाठी साईन करण्यासाठी चित्रपट निर्माते बऱ्याच कालावधीपासून मुलाखत करत होते. कारण त्यांना शाहरूख खानसोबत चांगला परफॉर्मन्स करणारी अभिनेत्री हवी होती. अखेर निर्मात्यांचा शोध थांबला असून भूमी पेडणेकरची या सिनेमासाठी वर्णी लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहरूख खान ऑक्टोबरपासून या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण शाहरूख 'झिरो' चित्रपटाचे काम आटोपल्यानंतर सुरू करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मथई करणार आहेत. शाहरूख खान व भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.
'सॅल्यूट' चित्रपट अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारीत असून शाहरूख पहिल्यांदाच बायोपिक करणार आहे. शाहरूख 'झिरो' चित्रपटाचे चित्रीकरण आटोपले असून सध्या व्हिएफएक्सवर काम चालू आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरूख बुटक्या व्यक्तीच्या रुपात दिसणार आहे. या सिनेमात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा व कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

Web Title: Bhumi Pednekar working with Shahrukh Khan in Salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.