भूमी पेडणेकरने सुशांत सिंग राजपूतला अशी वाहिली अनोखी श्रध्दांजली, सुशांतच्या स्मरणार्थ करणार हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 12:24 IST2020-06-29T12:21:55+5:302020-06-29T12:24:16+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 14 दिवस उलटले आहेत.

भूमी पेडणेकरने सुशांत सिंग राजपूतला अशी वाहिली अनोखी श्रध्दांजली, सुशांतच्या स्मरणार्थ करणार हे काम
सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने त्याच्या फॅन्ससह सहकलाकारांदेखील धक्का बसला आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने सुशांतच्या आठवणींना उजाळा देत इन्स्टाग्राम त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. भूमीने सुशांतसोबत सोनचिरिया सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे.
सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी भूमीने दिग्दर्शक अभिषेक कपूर यांची पत्नी प्रज्ञाच्या फाऊंडेशनसोबत 550 वंचित कुटुंबांना अन्न पुरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भूमी म्हणाली, "माझ्या लाडक्या मित्राच्या स्मरणार्थ एक साथ फाऊंडेशनसोबत 550 वंचित कुटुंबांना अन्न पुरवण्याची मी काम करते आहे. प्रत्येक गरजूला प्रेमाने मदत करूया. आता खरेच तशी वेळ आली आहे."
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 14 दिवस उलटले आहेत. तरीदेखील अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. याउलट हे प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्या कुटुंबाला दुसऱ्या राउंडच्या चौकशीसाठी बोलवणार आहेत. तर सुशांतची गर्लफ्रेंज रिया चक्रवर्तीचा भाऊ शॉविकला चौकशीसाठी बोलवले आहे. शॉविक आणि रिया सुशांतच्या कंपनीचे भागीदार होते.