Bhoothnath : ‘भूतनाथ’मधील क्यूट ‘बंकू’ 14 वर्षांनंतर कसा दिसतो? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 08:00 AM2022-12-15T08:00:00+5:302022-12-15T08:00:02+5:30

Bhoothnath : ‘भूतनाथ’ मधील बंकू असं म्हटलं की लगेच या चिमुकल्याचा निरागस चेहरा तुमच्या समोर येतो.

bhoothnath banku aka aman siddiqui is a grown up man now looks super dashin | Bhoothnath : ‘भूतनाथ’मधील क्यूट ‘बंकू’ 14 वर्षांनंतर कसा दिसतो? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, हँडसम

Bhoothnath : ‘भूतनाथ’मधील क्यूट ‘बंकू’ 14 वर्षांनंतर कसा दिसतो? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, हँडसम

googlenewsNext

2008 मध्ये आलेला ‘भूतनाथ’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. बच्चेकंपनीला हा सिनेमा जाम आवडला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन ‘भूता’च्या भूमिकेत दिसले होते. शिवाय क्यूट चेहऱ्याचा ‘बंकू’हा बालकलाकारही होता. ‘भूतनाथ’ मधील बंकू असं म्हटलं की लगेच या चिमुकल्याचा निरागस चेहरा तुमच्या समोर येतो.

बंकूची भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकाराचं नाव होतं अमन सिद्दीकी (Aman siddiqui). चित्रपटातही त्याने अमन नावाचं पात्र साकारलं होतं. पण प्रेमाने सगळे त्याला बंकू म्हणायचे. ‘भूतनाथ’ हा सिनेमा रिलीज होऊन आता 14 वर्षांपेक्षा अधिक काळ झालाये. हा बंकू आता मोठा झाला आहे. याच बंकूचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका फोटोत अमन हातात लाल रंगाचं जॅकेट घेऊन दिसतोय. कार्गो पँट व टी-शर्ट असा त्याचा लुक आहे. हा फोटो पाहून हाच तो बंकू  यावर विश्वास बसत नाही. इतका तो बदलला आहे. अर्थात बंकू कमालीचा हँडसम दिसतोय. 
‘भूतनाथ’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जुही चावला असे दिग्गज कलाकार झळकले होते. यामध्ये बंकू या बालकलाकाराने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. यानंतर ‘भूतनाथ रिटर्न्स’ आला. मात्र त्यात अमन सिद्दीकी नव्हता.

2013 साली ‘शिवालिक’ नावाच्या चित्रपटात अमन दिसला. पण हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला, हेही लोकांना कळलं नाही.  अमनने अनेक चित्रपट, जाहिरातींमध्ये काम केलं. मात्र, त्यानंतर त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

Web Title: bhoothnath banku aka aman siddiqui is a grown up man now looks super dashin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.