Bhool Bhulaiyaa 2 Teaser: मोस्ट अवेटेड 'भूल भुलैया 2'चा टीझर आऊट, पाहा कार्तिक आर्यनचा स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:11 PM2022-04-14T13:11:35+5:302022-04-14T19:09:43+5:30

'भूल भुलैया 2' चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील कार्तिक आर्यनचा लूक पाहण्यासारखा आहे.

Bhool Bhulaiyaa 2 Teaser: Teaser out of most awaited 'Bhool Bhulaiyaa 2' | Bhool Bhulaiyaa 2 Teaser: मोस्ट अवेटेड 'भूल भुलैया 2'चा टीझर आऊट, पाहा कार्तिक आर्यनचा स्वॅग

Bhool Bhulaiyaa 2 Teaser: मोस्ट अवेटेड 'भूल भुलैया 2'चा टीझर आऊट, पाहा कार्तिक आर्यनचा स्वॅग

googlenewsNext

अक्षय कुमारच्या भूलभुलैया या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटातील अक्षय कुमारचा लूकही खूप आवडला होता. 'भूल भुलैया पार्ट 2' देखील रिलीज होणार आहे हे जेव्हा लोकांना समजले तेव्हापासून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'भूल भुलैया 2' चे पोस्टर खूप पूर्वी रिलीज झाले होते, ज्यामध्ये कार्तिक आर्यनची झलक दिसली होती. आज 'भूल भुलैया 2' चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील कार्तिक आर्यनचा लूक पाहण्यासारखा आहे. कियारा अडवाणी 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

चित्रपटाचा टीझर इतका जबरदस्त आहे. टीझरची सुरुवात चित्रपटातील 'आमी जे तुम्हारो' या लोकप्रिय गाण्याने होते. त्यानंतर एक जुना भुताचा प्रकार दाखवला आहे. अचानक एक भितीदायक चेहरा समोर येतो. यानंतर कार्तिक आर्यनची एन्ट्री होते. गळ्यात रुद्राक्षाची माळ, डोक्यावर दुपट्टा आणि कुर्ता घातलेला कार्तिकचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. कार्तिकसोबत राजपाल यादवची झलकही दाखवण्यात आली आहे. टीझरनंतर लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटाचा टीझर 53 सेकंदांचा आहे, दरम्यान हा तुम्हाला अक्षय कुमारच्या भूल भुलैयाची आठवण करून देईल. 'भूल भुलैया 2' हा 2022 सालातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. याआधी हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होत होता, मात्र नंतर कोरोनामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर तो मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र नंतर काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.

'भूल भुलैया 2' 20 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय कियारा अडवाणी, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि तब्बू देखील दिसणार आहेत. 
 

Web Title: Bhool Bhulaiyaa 2 Teaser: Teaser out of most awaited 'Bhool Bhulaiyaa 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.