कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 12:34 IST2024-11-01T12:33:56+5:302024-11-01T12:34:13+5:30

'भूल भूलैय्या ३' सिनेमा आज दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालाय. त्यानिमित्ताने सिनेमाचा पहिला review समोर आलाय (bhool bhulaiyya 3)

Bhool Bhoolaiyya 3 review by taran adarsh kartik aryan vidya balan madhuri dixit | कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

 'भूल भूलैय्या ३' सिनेमा आज दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालाय. कार्तिक आर्यनची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. 'भूल भूलैय्या ३'मध्ये यावेळी कलाकारांची फौज आहे. कार्तिक आर्यनसोबत मंजुलिकाची भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनची सिनेमात पुन्हा एन्ट्री झालीय. तिच्या जोडीला यावेळी माधुरी दीक्षितही आहे. आज सिनेमा रिलीज होताच लोकांच्या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या आहेत. कसा आहे  'भूल भूलैय्या ३' याबद्दलचा Review जाणून घ्या. 

 'भूल भूलैय्या ३'चा पहिला Review समोर

कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३'चा पहिला रिव्ह्यू समोर आलाय. प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी सिनेमाला ४ स्टार दिले आहेत. हॉरर + कॉमेडी आणि उत्कृष्ट कथानक. कार्तिकचा दमदार परफॉर्मन्स. जोडीला माधुरी आणि विद्याची कमाल. अनीस बाझमींनी रंगत निर्माण केली. असं लिहून 'भूल भूलैय्या ३'चा तरण आदर्श यांनी  सिनेमाचं कौतुक केलंय. एकूणच अनेकांना 'भूल भूलैय्या ३' आवडलेला दिसत असून सिनेमाच्या कथेचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. 

'भूल भूलैय्या ३' ला सिंघम अगेनची टक्कर

'भूल भूलैय्या ३' सिनेमा आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालाय. या सिनेमाला सिंघन अगेनची तगडी टक्कर आहे. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाल्याने ऐन दिवाळीत प्रेक्षक कोणता सिनेमा पाहायला जास्त पसंती देतात हे पुढील काही दिवसांमध्ये कळेलच. 'भूल भूलैय्या ३'बद्दल सांगायचं तर अनीस बाझमींनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, विजय राज, संजय मिश्रा, राजपाल यादव हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: Bhool Bhoolaiyya 3 review by taran adarsh kartik aryan vidya balan madhuri dixit