Bholaa Trailer: अजय देवगणची धमाकेदार ॲक्शन असलेला 'भोला'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 15:28 IST2023-03-06T15:27:21+5:302023-03-06T15:28:21+5:30
'दृश्यम 2'च्या अफाट यशानंतर चाहते आता अजय देवगणच्या भोला या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Bholaa Trailer: अजय देवगणची धमाकेदार ॲक्शन असलेला 'भोला'चा ट्रेलर रिलीज
'दृश्यम 2'च्या अफाट यशानंतर चाहते आता अजय देवगणच्या भोला या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर आणि व्हीएफएक्सने प्रेक्षकांना आधीच प्रभावित केले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपवत आता अजय देवगणने भोलाचा थ्रिलर ट्रेलर रिलीज केला आहे.
अजय देवगणने रिलीज केला ट्रेलर
गेल्या अनेक दिवसांपासून भोलाच्या ट्रेलर रिलीजची तयारी सुरू होती. अजय देवगणने गेल्या आठवड्यातच ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली होती.आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दृश्यम 2 नंतर, अजयचा भोला हा देखील दक्षिण चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. भोलाची कथा साऊथच्या ब्लॉकबस्टर चित्रपट कार्ती मधून साकारली आहे. मूळ चित्रपटात अभिनेता कार्तीची मुख्य भूमिका होती आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.
‘भोला’ हा अजयच्या फिल्मी करिअरमधील आत्तापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. या वन मॅन आर्मी सिनेमात अजय एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.
अजय देवगण व तब्बूचा ‘भोला’ 30 मार्च 2023 रोजी रिलीज होतोय. हा सिनेमा अजयने स्वत: दिग्दर्शित केला आहे. चित्रपट तामिळ चित्रपट ‘कॅथी’चा रिमेक आहे. ओरिजनल सिनेमात साऊथ स्टार कार्थी लीड रोलमध्ये होता. ‘भोला’मध्ये अजय देवगण लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत तब्बू, संजय मिश्रा व दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘कॅथी’ एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे. अजय देवगण हिंदी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा 3 डीमध्ये घेऊन येतोय.