Pawan Singh : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या संसारात कुरबुर, पत्नीला देणार घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:06 IST2022-04-28T15:05:59+5:302022-04-28T15:06:43+5:30

Pawan Singh marriage in trouble : पत्नीनं केलेत गंभीर आरोप, वाचा काय आहे प्रकरण

bhojpuri star pawan singh marriage in trouble files for divorce | Pawan Singh : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या संसारात कुरबुर, पत्नीला देणार घटस्फोट

Pawan Singh : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या संसारात कुरबुर, पत्नीला देणार घटस्फोट

भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतून एक शॉकिंग बातमी समोर आलीये. भोजपुरी सुपरस्टार व गायक पवन सिंग (Pawan Singh) याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. पवन सिंगने पत्नी ज्योतीपासून घटस्फोटासाठी आरा कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. 
यादरम्यान पवन सिंगची पत्नी ज्योती हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोर्टाबाहेर तिच्या वकीलाने पवनसिंगवर शारिरीक व मानसिक छळाचा आरोप केला. वकीलांनी सांगितलं की, पवनसिंग व त्यांची पत्नी ज्योती यांच्यात कलह निर्माण झाला आहे. यामुळे अभिनेत्यानं घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. लग्नानंतर पवन सिंग पत्नीचा छळ करत होता. त्याने अनेकदा तिला मारहाण व शिवीगाळ केली. त्याने दोनवेळा तिला गर्भपात करायला भाग पाडलं.

पवन सिंगचं हे दुसरं  लग्न  आहे. पहिली पत्नी नीलम हिच्या मृत्यूनंतर पवन खूप एकटा पडला होता. 2014 साली त्याचा नीलमसोबत विवाह झाला होता. 8 मार्च 2015 रोजी नीलमने आत्महत्या केली होती. यादरम्यान पवन सिंगचं भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह  हिच्यासोबत नाव जोडलं गेलं होतं.  परंतु याच दरम्यान 2018 साली पवन सिंगने ज्योती नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. या लग्नानंतर अक्षरा आणि पवन सिंग यांच्यातील वाद बराच काळ मीडियात चर्चेत होता .अक्षराने पवन सिंगवर अनेक गंभीर आरोप केले होते.

पवन सिंगची दुसरी पत्नी ज्योती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा पवन सिंगसोबत कधीही कुठेही दिसली नाही.  पवनसिंग हा भोजपुरी सिंगर, म्युझिक कंपोझर, प्रोड्यूसर आहे. बालपणापासून त्याने गायला सुरूवात केली. त्याच्या नावावर अनेक हिट भोजपुरी सिनेमे आहेत. अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये तो झळकला आहे.

Web Title: bhojpuri star pawan singh marriage in trouble files for divorce