तरुणाने खूश होऊन लाईव्ह शोमध्येच केलं फायरिंग, थेट गायिकेला लागली गोळी; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 09:07 AM2023-06-02T09:07:16+5:302023-06-02T09:09:11+5:30

गायिका जेव्हा गाण्यासाठी स्टेजवर आली तेव्हाच एका तरुणाने आनंदात गोळीबार सुरु केला.

bhojpuri singer nisha upadhyay injured during live performance as man did firing | तरुणाने खूश होऊन लाईव्ह शोमध्येच केलं फायरिंग, थेट गायिकेला लागली गोळी; रुग्णालयात दाखल

तरुणाने खूश होऊन लाईव्ह शोमध्येच केलं फायरिंग, थेट गायिकेला लागली गोळी; रुग्णालयात दाखल

googlenewsNext

प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्यायवर (Bhojpuri Singer Nisha Upadhyay) लाईव्ह कार्यक्रमातच गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका स्टेज शोदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. निशा जेव्हा गाण्यासाठी स्टेजवर आली तेव्हाच एका तरुणाने आनंदात गोळीबार सुरु केला. दरम्यान या गोळीबारात एक गोळी गायिकेच्या मांडीला लागली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

युट्यूब आणि सोशल मीडियावर आपल्या आवाजाची जादू पसरवणारी भोजपुरी गायिका निशा उपाध्याय ठिकठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्स देते. तिच्या कार्यक्रमांसाठी मोठी गर्दीही होते. माध्यम रिपोर्टनुसार ३१ मे रोजी निशा एका उपनयन संस्काराच्या कार्यक्रमात गाण्यासाठी गेली होती. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालणार होता. जेव्हा निशाच्या परफॉर्मन्सची घोषणा झाली तेव्हा एका तरुणाने आनंदाच्या भरात हवेत गोळीबार सुरु केला. यामुळे सगळीकडे खळबळ माजली. दरम्यान एक गोळी निशाच्या डाव्या पायाला लागली. तिला लगेच पटना येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. निशाच्या कुटुंबालाही कळवण्यात आलं. या घटनेनंतर गोळीबार करणारा व्यक्ती फरार झाला आहे. निशाची तब्येत आता धोक्याच्या बाहेर आहे. मात्र या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

निशा उपाध्याय सोशल मीडिया सेन्सेशन आहे. बिहारमध्ये तिची खूप जास्त क्रेझ आहे. फेसबुक पेजवर तिचे १० मिलियन फॉलोअर्स आहेत. तसंच तिचं युट्यूब चॅनलही आहे. 'ले ले आए कोको कोला','नवकर मंत्र','हसी हसी जान मारेला' ही तिची काही लोकप्रिय गाणी आहेत. भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील ती प्रसिद्ध चेहरा आहे. कोरोना काळात तिने चॅरिटीसाठी कार्यक्रम केला होता मात्र गर्दी जमवल्याने तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. 

Web Title: bhojpuri singer nisha upadhyay injured during live performance as man did firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.