'या' गंभीर आजाराचा सामना करतेय कॉमेडियन भारती सिंग, रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 09:12 IST2024-05-03T09:11:57+5:302024-05-03T09:12:08+5:30
लाफ्टर क्वीन भारती सिंग हिची तब्येत बिघडली असून सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

'या' गंभीर आजाराचा सामना करतेय कॉमेडियन भारती सिंग, रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
लाफ्टर क्वीन भारती सिंग हिची तब्येत बिघडली असून सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतेच भारतीनं तिच्या 'लाइफ ऑफ लिंबाचिया' यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये असल्याचं दिसून येत आहे. पती हर्ष लिंबाचिया आणि कुटुंबातील इतर सदस्य तिची काळजी घेत आहेत.
भारती सिंग नवीन व्लॉगमध्ये सांगितले की, तिला गेल्या तीन दिवसांपासून वेदना होत होत्या. त्यानंतर ती पती हर्षसोबत रुग्णालयात आली होती. फूड इन्फेक्शन झालं असून सारखं पोट दुखत असल्याचं भारतीनं सांगितलं. अभिनेत्री रुग्णालयात दाखल झाल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तसेच अभिनेत्रीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
पोटाच्या संसर्गामुळे भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु जेव्हा चाचण्या केल्या तेव्हा इतर काही समस्याही समोर आल्या आहेत. भारतीच्या पित्त मूत्राशयात दगड असून तो व्हेनमध्ये अडकल्याचं समोर आलं. त्यामुळे भारतीला त्रास होत आहे. भारती सिंहने तिच्या चाहत्यांना कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला दिला आहे. भारती तिच्या बाळाला खूप मिस करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये म्हणाली. भारतीच्या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला लवकरात लवकर बरे वाटावे याकरता प्रार्थना केली आहे.