भज्जीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 11:51 IST2016-12-24T11:51:40+5:302016-12-24T11:51:40+5:30

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या लग्नानंतर एकच वर्षात त्यांच्या घरात चिमुकल्या परीने जन्म ...

Bhajji shared the girl's first photo! | भज्जीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो!

भज्जीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो!

रतीय क्रिकेट टीमचा खेळाडू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या लग्नानंतर एकच वर्षात त्यांच्या घरात चिमुकल्या परीने जन्म घेतला. त्यांनी ‘हिनाया हीर प्लाहा’ असे तिचे नाव ठेवले. तिच्या जन्मानंतर भज्जी आणि गीताने हिनायाला मीडियापासून जरा लांबच ठेवले. पण, तरीही मीडियाने काही हिनायाची पाठ सोडली नाही.

अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर नुकतेच माध्यमांनी अमृतसरमधील गोल्डन टेम्पल येथे भज्जी कुटुंबियांना कॅमेऱ्यात कैद केलेच. भज्जीने हाच फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत भज्जीने त्याची लाडकी लेक हिनाया हीर प्लाहा हिला धरले असून गीता बसराही त्याच्या बाजूला उभी असलेली दिसतेय. 
 
हिनाया हीर प्लाहा हिचा इन्स्टाग्रामवरील हा पहिलाच पब्लिक अ‍ॅपिअरन्स होता. फोटोला ‘लाख खुशियाँ पठ शेयाँ, जे सथगुरू नादर करे.. ब्लेस्ड..हिनाया..हिनाया..हीर...वाहेगुरू..गोल्डन टेम्पल...ग्रेटफुल’ असे कॅप्शन दिले आहे.  हिनायासोबत भज्जी-गीता हे अतिशय आनंदी आणि समाधानी दिसत आहेत. कॅमेऱ्याकडे पाहून फोटो  आणि सेल्फीसाठी पोझ देणं याविषयी हिनायाला  काहीही ठाऊक नसल्याने ती अतिशय हसतमुख चेहऱ्याने कॅमेऱ्याला पाहत आहे. पण, तिची निरागस पोझ लक्ष वेधून घेते. 

                                                              

Web Title: Bhajji shared the girl's first photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.