'बाहों में चली आओ...' गाण्यावर भाग्यश्रीच्या ग्लॅमरस अदा, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:17 IST2025-11-27T14:17:01+5:302025-11-27T14:17:36+5:30
Actress Bhagyashree : भाग्यश्री सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर एक अत्यंत सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

'बाहों में चली आओ...' गाण्यावर भाग्यश्रीच्या ग्लॅमरस अदा, व्हिडीओ होतोय व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) 'मैने प्यार किया' या सुपरहिट सिनेमातून घराघरात पोहोचलेली आणि आजही लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. भाग्यश्री सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर एक अत्यंत सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बाहों में चली' या गाण्यावरचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या रंगाची शिमरी साडी परिधान केली असून ती खूपच मोहक आणि सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे, तिचे वय ५६ असले तरी, तिचे सौंदर्य आणि फिटनेस आजही बॉलिवूडमधील आजच्या तरुण अभिनेत्रींनाही लाजवेल असा आहे.
व्हिडीओमध्ये तिचा आत्मविश्वास आणि मनमोहक अदाकारी स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्य आणि साडीतील तिचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते चकित झाले आहेत. हा व्हिडीओ बघून अनेक युजर्सनी तिची तुलना तिच्या 'मैने प्यार किया' चित्रपटातील अभिनयासोबत केली आहे. तिने स्वतःला इतकं फिट आणि तरुण कसं ठेवलं आहे, याबद्दलही चाहते तिची प्रशंसा करत आहेत.
वर्कफ्रंट
पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर भाग्यश्रीने अनेक हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. दीर्घकाळ बॉलिवूडपासून दूर राहिल्यानंतर तिने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केले आहे. ती 'बाहुबली' फेम प्रभाससोबत 'राधे श्याम' या चित्रपटात दिसली.