१९ तरुणींचा मृत्यू अन् पोलिसांची दमछाक करणाऱ्या खलनायकाची थ्रिलर कहाणी; ओटीटीवरील 'हा' ट्रेंडिंग सिनेमा पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:07 IST2025-11-12T16:01:20+5:302025-11-12T16:07:01+5:30
१९ तरुणींचा मृत्यू अन्...; ओटीटीवर ट्रेंडिंग होतोय हा क्राईम थ्रिलर सिनेमा, तुम्ही पाहिलात का?

१९ तरुणींचा मृत्यू अन् पोलिसांची दमछाक करणाऱ्या खलनायकाची थ्रिलर कहाणी; ओटीटीवरील 'हा' ट्रेंडिंग सिनेमा पाहिलात?
OTT Trending Movie: हल्ली प्रेक्षकांमध्ये थ्रिलर, रहस्य आणि क्राइम अशा जॉनरच्या सीरिजबद्दल कायम चर्चा सुरु असते. अशा प्रकारच्या सीरिजना ओटीटी प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.अशातच अलिकडेच डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या एका सीरिजने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं आहे. यातील सस्पेन्स आणि क्लायमॅक्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल. या सीरिजचं नाव भागवत चॅप्टर 1: राक्षस आहे.
२ तास ७ मिनिटांच्या या क्राइम थ्रिलर चित्रपटाला त्यामधील सस्पेन्स, इमोशन्स आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. अक्षय शेर दिग्दर्शित ही सीरिज एका सत्य घटनेवर आधारित आहे. अभिनेता अर्शद वारसी आणि जितेंद्र कुमार हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
असं आहे कथानक?
या चित्रपटाची सुरुवात एका तरुणीच्या हत्येच्या प्रकरणापासून सुरु होते. पण तपासादरम्यान, या प्रकरणाला वेगळं वळण येतं. त्यावेळी १९ मुलींची हत्या झाल्याचे उघड होतं. खुनी अत्यंत हुशार असतो. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि नंतर त्यांची हत्या करतो. पोलीस या मास्टर माईंड गुन्हेगाराला पकडण्यासाठी वाटेल ते करतात. मात्र, प्रत्येकवेळी तो त्यांच्या हातून निसटतो.
अर्शद वारसी या चित्रपटात एका पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येईल.