​‘शिवाय’ वांद्यात??

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:11 IST2016-05-26T14:41:16+5:302016-05-26T20:11:16+5:30

होय, अजय देवगण अभिनीत ‘शिवाय’ हा चित्रपट रिलीज होण्याआधीच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. काही चित्रपट रिलीज नंतर तर काही ...

'Besides' in the bar ?? | ​‘शिवाय’ वांद्यात??

​‘शिवाय’ वांद्यात??

य, अजय देवगण अभिनीत ‘शिवाय’ हा चित्रपट रिलीज होण्याआधीच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. काही चित्रपट रिलीज नंतर तर काही रिलीजपूर्वीच वांद्यात सापडतात. ‘शिवाय’ रिलीज आधीच वांद्यात सापडला आहे. चित्रपटाचे पहिले टीजरही आऊट झालेले नाही आणि त्यापूर्वीच चित्रपटाच्या एका पोस्टरने वाद ओढवून घेतला आहे. एका बातमीनुसार, दिल्लीच्या एका वकिलाने अजय व त्याच्या चित्रपटाच्या डायरेक्टोरियल कू्र विरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘शिवाय’चे एक पोस्टर हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे. यात अजय भगवान शिवाच्या आकृतिवर जोडे घालून चढत असताना दाखवले आहे. या पोस्टरमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे या वकीलाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आता या तक्रारीचे पुढे काय होते, ते कळेलच!!

Web Title: 'Besides' in the bar ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.