'बेगम' बेबो बनणार 'आई' !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 13:40 IST2016-07-02T08:07:43+5:302016-07-02T13:40:57+5:30
Now its confirmed बातमी आली आहे ती चक्क सैफ अली खान कडून नुकतचं त्याने करिनाला दिवस गेले असल्याचे जाहीर ...

'बेगम' बेबो बनणार 'आई' !
Now its confirmed बातमी आली आहे ती चक्क सैफ अली खान कडून नुकतचं त्याने करिनाला दिवस गेले असल्याचे जाहीर केलंय.बॉलिवूडमध्ये सैफिना म्हणून प्रसिध्द असलेली जोडी म्हणजे करिना-सैफ . काही दिवसांपासून करिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगत होत्या , करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील मला लवकरच आजोबा बनायचं आहे असे विधान केले होत. या सगळ्यामुळे करिना-सैफच्या घरात लवकरच पाळणा हलणार असणार असल्याचे म्हटले जात होते. आज ही खूशखबर खुद्द सैफनंच दिलीय. अभिनेता सैफ अली खाननं आपण 'बाबा' बनणार असल्याची गुड न्यूज मिडीयासोबत शेअर केलीय. येत्या डिसेंबर महिन्यात आम्हाला बाळ होणार असल्याचे त्यानं म्हटलंय आहे. चाहत्यांच्या आशिर्वादासाठी आम्ही आभारी आहोत तसेच मीडियाने आमच्या खासगी आयुष्यात ठवळाढवळ न करता पेशन्स दाखवल्याबद्दलही आम्ही आभारी आहोत' असेही सैफने म्हटले आहे.