बाहुबली फेम प्रभास करणार 'या' महिन्यात साहोच्या शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 17:46 IST2017-07-12T12:16:09+5:302017-07-12T17:46:09+5:30

बाहुबलीच्या सक्सेसनंतर प्रभास लवकरच आपला आगामी चित्रपट 'साहो'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. युएसमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर तो भारतात परतला ...

The beginning of shooting of Saho in the month of 'Bahubali Fame Prabhas' will begin | बाहुबली फेम प्रभास करणार 'या' महिन्यात साहोच्या शूटिंगला सुरुवात

बाहुबली फेम प्रभास करणार 'या' महिन्यात साहोच्या शूटिंगला सुरुवात

हुबलीच्या सक्सेसनंतर प्रभास लवकरच आपला आगामी चित्रपट 'साहो'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. युएसमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर तो भारतात परतला आहे.सध्या सगळ्या पार्ट्ंयामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी प्रभास लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. एका वृत्तपत्रांने दिलेल्या बातमीनुसार बाहुबलीनंतर प्रभास ऑगस्ट महिन्यात आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतो आहे. साहोचा टीझर बाहुबली2च्या वेळीच रिलीज करण्यात आला आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा बजेट 150 कोटींचा आहे. प्रभास यात एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. 'साहो'मध्ये नील नितिन मुकेश ही दिसणार आहे. त्याच्या भूमिकेला एक नेगेटीव्ह शेड असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का शेट्टीला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अनुष्काचे वाढलेले वजन तिच्यासाठी मारक ठरले. जीममध्ये वर्कआऊट करुन ही अनुष्काचे वजन काही कमी झाले नाही. 

also read : १८० करोडच्या संपत्तीचा मालक आहे ‘बाहुबली’, अशी आहे लाइफस्टाइल !
 

काही दिवसांपूर्वी एक वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत नील नितिन मुकेश म्हणाला होता की, 'साहो' हा बाहुबलीप्रमाणे मेगा बजेट चित्रपट असणार आहे. यात मी प्रभासला त्रास देताना दिसणार आहे.चित्रपटाचे दिग्दर्शक सुजितच्या कल्पना शक्तीची आणि कन्सेप्टचे मला खरोखरच कौतुक वाटत असल्याचे त्याने सांगितले.  2018 चा हा ब्लॉकबस्टर चित्रपट असणार आहे. बाहुबलीनंतर तुम्ही या चित्रपटाच्या प्रेमात पडाल. साहोमध्ये तुम्हाला भरपूर अॅक्शन बघायला मिळेल. ज्याकरिता इंटरनॅशनल स्टंट्समॅनला नुकतेच ऑन बोर्ड घेण्यात आले आहे. अ‍ॅक्शन सीक्वेंस वर्ल्ड क्लास दर्जाचे असणार आहे.''  चित्रपटाची शूटिंग मुंबई, अबू धाबी आणि रोमानिया येथे होणार आहे. 

Web Title: The beginning of shooting of Saho in the month of 'Bahubali Fame Prabhas' will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.