'बेटे को हाथ लगाने से पहले बाप...' शाहरुख खानच्या या डायलॉगला समीर वानखेडेंनी म्हटलं 'चीप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:37 IST2024-12-18T16:36:24+5:302024-12-18T16:37:00+5:30
Sameer Wankhede And Shah Rukh Khan : नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप...' या लोकप्रिय डायलॉगला ‘चीप’ म्हटले आहे.

'बेटे को हाथ लगाने से पहले बाप...' शाहरुख खानच्या या डायलॉगला समीर वानखेडेंनी म्हटलं 'चीप'
नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी शाहरुख खानच्या 'जवान' (Jawan Movie) या चित्रपटातील 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप...' या लोकप्रिय डायलॉगला ‘चीप’ म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर किंग खानचा मुलगा आर्यन खान(Aaryan Khan)ला अटक करण्यात आली होती. यानंतर अनेक दिवस आर्यन खान तुरुंगात होता. आर्यन खान प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते. आर्यन जेव्हा या प्रकरणातून बाहेर आला तेव्हा शाहरुख खानने जवान चित्रपट केला आणि त्यात "बेटे को हाथ..." हा डायलॉग बोलला, ज्याला लोक समीर वानखेडेला टार्गेट केल्याचे मानत होते. समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीदरम्यान या संपूर्ण प्रकरणावर चर्चा केली आहे.
समीर वानखेडे मुलाखतीदरम्यान म्हणाले की, मला कोणाचेही नाव घेऊन विनाकारण प्रसिद्धी द्यायची नाही आणि लीक झालेल्या चॅट्सचा प्रश्न आहे, तो कोर्टात आहे, त्यामुळे त्याच्यावर काहीही बोलायचे नाही. समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, 'मी कोणाचेही नाव घेऊन कोणाला प्रसिद्ध करायचे नाही. जे चॅट्स लीक झाल्या त्या माननीय उच्च न्यायालयासमोरच्या आहेत, त्यामुळे त्यावर भाष्य करायला मला आवडणार नाही.
मी सिनेमे बघत नाही...- वानखेडे
आपला मुद्दा पुढे नेत समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या डायलॉगवर बोलले आणि म्हणाले की, 'आणि तुम्ही जो डायलॉग बोललात... मी सिनेमे बघत नाही, मला जास्त सिनेमे बघण्याचा छंद नाही, हा जो शब्द आहे बाप... बेटे हे खूपच चीप आणि थर्ड क्लास वाटतात. आपल्या भारतीय संस्कृतीत असे शब्द वापरत नाही. हे रोड साइड डायलॉग्स आहेत आणि मला स्वतःला इतके खाली पाडायचे नाही की मी रोड साइड डायलॉग्सना उत्तर देतो.
जवान सिनेमाला मिळाली पसंती
शाहरुख खानच्या जवानला देशातच नव्हे तर संपूर्ण जगात खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील विक्रम मोडले आहेत. या चित्रपटात बाप बेटेवाला जो संवाद होता, जो लोकांमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता.