KGF 2 मध्ये एन्ट्री करण्याआधी रॉकीभाईची गर्लफ्रेंड श्रीनिधी शेट्टी होती या क्षेत्रात कार्यरत, असा मिळाला पहिला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:19 IST2022-04-25T17:18:47+5:302022-04-25T17:19:27+5:30
Srinidhi Shetty : श्रीनिधी शेट्टीने KGF सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून तिला खूप लोकप्रियता मिळाली.

KGF 2 मध्ये एन्ट्री करण्याआधी रॉकीभाईची गर्लफ्रेंड श्रीनिधी शेट्टी होती या क्षेत्रात कार्यरत, असा मिळाला पहिला ब्रेक
साउथचा स्टार यश (Yash) आणि श्रीनिधी (Srinidhi Shetty) स्टारर KGF Chapter 2 ने ११ दिवसात ८८० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट १००० क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ आहे आणि ते येत्या दिवसात शक्य होऊ शकते. प्रशांत नीलचे दिग्दर्शन जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. त्याचे हिंदी व्हर्जनही धुमाकूळ घालत आहे, ज्याने आतापर्यंत ३७५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. या चित्रपटातील श्रीनिधीच्या भूमिकेचेही कौतुक होत असून या यशामुळे ती खूप खूश आहे.
अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी हिने केजीफ चाप्टर १ चित्रपटाच्या (KGF: Chapter 1) मधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पहिल्याच चित्रपटातून ती इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली. श्रीनिधीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. तिने आतापर्यंत प्रशांत नीलच्या दोन चित्रपटात काम केले आहे आणि दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
त्यानंतर आता ती लवकरच कोब्रा या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. त्याचे शूटिंग पूर्ण झाले असून त्याचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. कोब्रा या चित्रपटातून ती कॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. खरेतर श्रीनिधीचे स्वप्न अभिनेत्री होण्याचे अजिबात नव्हते. कारण तिला नेहमीच डॉक्टर बनण्याची इच्छा होती. तिने सुरुवातीचे शिक्षण श्री नारायण गुरु इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेतले आणि त्यानंतर त्यांनी जैन युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
अभिनेत्री होण्याआधी ती Accenture मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होती आणि यादरम्यान ती काही मॉडेलिंग असाइनमेंट करत होती. तिने २०१५ साली मिस दिवासाठी ऑडिशन दिली पण त्या दरम्यान तिच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले आणि त्या दरम्यान तिला ३ महिने बेड रेस्ट घेण्यास सांगितले होते. त्यानंतर २०१६ मध्ये पुन्हा मिस दिवा स्पर्धेत भाग घेतला आणि मिस दिवा सुपरनॅशनल २०१६चा किताब तिने पटकावला. हे विजेतेपद मिळवणारी ती भारताची दुसरी प्रतिनिधी आहे. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.