बिकिनीमध्ये पतीसोबत सेल्फी घेताना दिसली मंदिरा बेदी, सोशल मीडियावर खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 22:05 IST2017-12-29T16:35:28+5:302017-12-29T22:05:41+5:30

अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या थायलॅण्ड येथे फॅमिलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत असून, तेथील काही फोटोज् तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी एकच खळबळ उडाली आहे.

Bedi, a social worker who took a selfie along with her husband in Bikini, sensation on social media! | बिकिनीमध्ये पतीसोबत सेल्फी घेताना दिसली मंदिरा बेदी, सोशल मीडियावर खळबळ!

बिकिनीमध्ये पतीसोबत सेल्फी घेताना दिसली मंदिरा बेदी, सोशल मीडियावर खळबळ!

िनेत्री तथा डिझायनर मंदिरा बेदी सध्या आपल्या फॅमिलीसोबत थायलॅण्ड येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. मंदिराने तिच्या या व्हेकेशनचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, त्यामध्ये ती जबरदस्त बोल्ड अंदाजात दिसत आहे. होय, बिकिनी अवतारात असलेली मंदिरा स्विमिंग पुलमध्ये उभ्या असलेल्या पतीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मंदिरा यंदा न्यू इअर याच ठिकाणी सेलिब्रेट करणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मंदिराने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असता, ती यूजर्सच्या रडारवर सापडली होती. आता पुन्हा एकदा मंदिराने अशा अंदाजातील सेल्फी शेअर केल्यामुळे ती टीकेची धनी ठरू शकते. 

१४ फेब्रुवारी १९९९ मध्ये चित्रपट निर्माता राज कौशल याच्याशी लग्न करणाºया मंदिराला सहा वर्षांचा वीर नावाचा एक मुलगा आहे. ज्याचा जन्म १९ जून २०११ रोजी झाला आहे. ४५ वर्षीय मंदिरा आपले प्रोफेशन आणि फिटनेसविषयी प्रचंड सजग आहे. त्यामुळेच या वयातही ती फिट दिसते. खरं तर त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेते. नियमित वर्कआउट आणि फिटनेस डेडिकेशनमुळेच तिला हा लूक मिळाला होता. 
 

मंदिराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जर नजर टाकली तर बºयाचशा फोटोंमध्ये ती वर्कआउट करताना बघावयास मिळते. एका मुलाखतीत मंदिराने सांगितले होते की, माझ्या झीरो फिटनेसचे रहस्य दररोज दहा किलोमीटर धावणे होय. यावेळी तिने हेदेखील म्हटले होते की, मी ज्या ठिकाणी जाते त्याठिकाणी स्पोटर्स शूज सोबत घेऊन जात असते. कारण रनिंग केल्याशिवाय माझा दिवस जात नसल्याचे तिने म्हटले होते. दरम्यान, मंदिराच्या या अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी तिच्या फोटोला पसंती दिली तर काहींनी त्यावर सडकून टीकाही केली. 

Web Title: Bedi, a social worker who took a selfie along with her husband in Bikini, sensation on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.