बेबो म्हणते,‘माझी टिका करणे सर्वांना आवडते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 23:01 IST2016-02-20T06:01:38+5:302016-02-19T23:01:38+5:30

बेगम करिना कपूर खान ही कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आॅनलाईन नसते. कारण ‘ट्विटर हे फुलटाईम कमिटमेंट आहे,’ असे ती ...

Bebo says, 'I love everyone's comments' | बेबो म्हणते,‘माझी टिका करणे सर्वांना आवडते’

बेबो म्हणते,‘माझी टिका करणे सर्वांना आवडते’

गम करिना कपूर खान ही कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आॅनलाईन नसते. कारण ‘ट्विटर हे फुलटाईम कमिटमेंट आहे,’ असे ती मानते. पण, तिचा विश्वास केवळ तिच्या चाहत्यांवर आहे. कारण तिला माहितीये की, तिच्या यशापयशात केवळ तिचे चाहतेच तिच्या सोबत आहेत. 



arjun and kareena

चाहत्यांच्या प्रेमाविषयी बोलताना ती म्हणते,‘ माझ्याबद्दल काहीतरी गंभीर आणि टिकात्मक बोलणे हे काही लोकांचे विशेष आवडीचे काम आहे. खरंतर मी खुप खुल्या मनाची आणि दिलदार आहे. त्यामुळे मला त्याचे काही वाटत नाही. पण,मेरे फॅन्स कि सी को नही छोडते, अ‍ॅण्ड डिस्पाईट माय अप्स अ‍ॅण्ड डाऊन्स, दे हॅव नेव्हर डिसअपाँर्इंटेड मी, इव्हन दो आय हॅव अ‍ॅट टाईम्स.’ 

kareena

आर.बल्की यांचा आगामी रोमँटिक चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ मध्ये बेबोने करिअर ओरिएंटेड महिलेचा आणि अर्जुन कपूर याने घर सांभाळणाºया पतीची भूमिका केली आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी बोलताना बेबो म्हणते,‘ किया ही माझ्यासारखीच आहे. तिचे कबीरवर खुप प्रेम असते. तिला तिचे ध्येय गाठता यावे म्हणून ती खुप प्रयत्न करत असते. तरी ती इमोशनल पण खुप आहे.’

 

Web Title: Bebo says, 'I love everyone's comments'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.