वयाने दुप्पट असलेल्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 20:12 IST2018-05-18T14:41:16+5:302018-05-18T20:12:18+5:30

आपल्या वयाने दुप्पट असलेल्या सुपरस्टारसोबत ही अभिनेत्री रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. ती या चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करीत आहे.

Beautiful actress will be seen in romance with the super-doubled superstar. | वयाने दुप्पट असलेल्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री!!

वयाने दुप्पट असलेल्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री!!

रेक्षकांना बॉलिवूडमधील प्रत्येक स्टारबद्दलची इत्यंभुत माहिती असते. कोणता स्टार कुठल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे?, त्याचा आगामी चित्रपट कोणता? त्याचबरोबर इंडस्ट्रीत कोण न्यूकमर एंट्री करीत आहे? या सर्वांविषयी प्रेक्षक माहिती ठेवून असतात. मात्र साउथ फिल्म इंडस्ट्रीत काय घडामोडी घडतात हे फारच कमी प्रेक्षक जाणून असतात. अशात साउथ इंडस्ट्रीबाबतच एक बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, एक अत्यंत सुंदर अभिनेत्री साउथच्या या सुपरस्टारसोबत आपल्या करिअरला सुरुवात करीत आहे. सध्या त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यात तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. 



अभिनेत्री मालविका शर्मा साउथ सुपरस्टार रवि तेजासोबत डेब्यू करीत आहे. २० वर्षीय मालविकाला अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी अधिक ओळखले जाते. वास्तविक ज्या सुपरस्टारसोबत ती डेब्यू करीत आहे, त्याच्या अन् तिच्या वयात खूप मोठे अंतर आहे. खरं तर बॉलिवूडमध्येच नव्हे तर टॉलिवूड आणि कॉलीवूडमध्येही वयाच्या अंतराला फारसे महत्त्व दिले जात नाही. असेच काहीसे चित्र मालविकाबाबत बघावयास मिळत आहे. रवि तेजाचे वय ५० वर्षे इतके आहे तर मालविकाचे वय केवळ २० वर्ष आहे. दोघांच्या वयात दुप्पटीपेक्षा अधिक  फरक आहे. 



दरम्यान, मालविका ‘नेला टिकट’ या तेलगू चित्रपटात रवि तेजासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाला कल्याण कृष्णा कुरासाला यांनी दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात रवि तेजा एका मेडिकलच्या विद्यार्थ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा अ‍ॅक्शन आणि रोमान्सने भरपूर आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यात रवि ताजा जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. चित्रपटात रवि व्यतिरिक्त जगपाथी बाबू, जयप्रकाश रेड्डी आणि रघुबाबू यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: Beautiful actress will be seen in romance with the super-doubled superstar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.