​बौशाली सिन्हा ‘इंडियन वुमेन अचिव्हर्स’ने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 14:50 IST2016-06-16T09:20:05+5:302016-06-16T14:50:05+5:30

भारतातील जिद्दी आणि मेहनती स्त्रियांच्या आदरासाठी देणात येणाऱ्या ‘इंडियन वुमेन अचिव्हर्स’ पुरस्काराने बॉलिवूडची प्रॉडक्शन डिझायनर आणि आर्ट डिरेक्टर बौशाली ...

Bauhari Sinha honored with 'Indian Women Achievers' | ​बौशाली सिन्हा ‘इंडियन वुमेन अचिव्हर्स’ने सन्मानित

​बौशाली सिन्हा ‘इंडियन वुमेन अचिव्हर्स’ने सन्मानित

रतातील जिद्दी आणि मेहनती स्त्रियांच्या आदरासाठी देणात येणाऱ्या ‘इंडियन वुमेन अचिव्हर्स’ पुरस्काराने बॉलिवूडची प्रॉडक्शन डिझायनर आणि आर्ट डिरेक्टर बौशाली सिन्हाला सन्मानित करण्यात येणार आहे. 

बौशालीने ‘क्या कूल है हम ३’, ‘चॉक अँड डस्टर’, ‘गब्बर इज बॅक’, ‘टोटल सियाप्पा’ या चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम सांभाळले आहे. तर ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’, ‘आत्मा’, ‘मारगारिता विथ अ स्ट्रॉ’, ‘राऊडी राठोड’ या चित्रपटांचे आर्ट डिरेक्शन बौशालीने केले आहे. तसेच तिने संजय लीला भंसाळी यांच्या ‘लाल इश्क’ या मराठी चित्रपटाचे  आर्ट डिरेक्शन केले आहे.

 बौशाली सिन्हाने बॉलिवूड मध्ये दिलेल्या योगदानासाठी तिला ‘इंडीयन वुमेन अचिव्हर्स पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Bauhari Sinha honored with 'Indian Women Achievers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.