बॅटल आॅफ सत्याग्रहीला लवकरच सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 15:59 IST2017-03-10T10:29:29+5:302017-03-10T15:59:29+5:30
अभिनेता रणदीप हुड्डाच्या अनुसार ‘बॅटल आॅफ सत्याग्रही’ला लवकरच सुरूवात होईल. चित्रपटाच्या शूटिंगबाबत झालेल्या अनेक वादविवादानंतर याची सुरूवात होते आहे. ...

बॅटल आॅफ सत्याग्रहीला लवकरच सुरूवात
अ िनेता रणदीप हुड्डाच्या अनुसार ‘बॅटल आॅफ सत्याग्रही’ला लवकरच सुरूवात होईल. चित्रपटाच्या शूटिंगबाबत झालेल्या अनेक वादविवादानंतर याची सुरूवात होते आहे.
रणदीप म्हणाला, ‘सूरा सो पहचानिये, जो लाडे दिन के हेत, पुर्जा-पुर्जा कट मारे, कबहु ना छडे खेत’ अशी या चित्रपटाची थीम आहे. अर्थात जो गरिबांसाठी लढतो तो खरा धाडसी. तो अनेक तुकड्यांमध्ये कापला जाऊ शकतो अथवा त्याचा मृत्यू होऊ शकतो, परंतु त्याने क्षेत्र सोडता कामा नये’ गुरू गोविंदसिंग यांचे हे वचन आहे. त्यामुळे आम्ही देखील मैदान सोडणार नाही. याला आम्ही साकारणार आहोत.’ं
१८९७ साली वायव्य प्रांतात ब्रिटीश इंडियन आर्मी आणि अफगाण ओर्काझाई आदिवासींमध्ये झालेल्या लढाईची या चित्रपटाला पार्श्वभूमी आहे. पगडी घातलेला रणदीप म्हणाला, ‘यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हा खूप मोठा चित्रपट आहे. एका विशिष्ट बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे, ज्यामुळे फायदाही होऊ शकेल. यामध्ये प्री-प्रॉडक्शन कामही खूप आहे. आम्ही खूपच लवकर याची सुरूवात केली होती आणि आमची तयारीही झालेली नव्हती.’
गेल्या आॅक्टोबर महिन्यात शूटिंगला सुरूवात होणार होती. तथापी दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्माते यांच्यात वाद निर्माण झाले. या चित्रपटात रणदीप हुड्डा हा हवालदार इशर सिंग याची भूमिका साकारतो आहे.
रणदीपने यापूर्वी सलमान खानसोबत सुलतानमध्ये भूमिका साकारली होती.