'या' अभिनेत्रीने 'मिस इंडिया'च्या मंचावर दिली होती ऐश्वर्याला टक्कर, आज ही सुंदरी झाली संन्यासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:05 IST2026-02-20T10:04:54+5:302026-02-20T10:05:38+5:30
Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत जे या झगमगत्या विश्वाला कंटाळून त्यांनी इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला आहे.

'या' अभिनेत्रीने 'मिस इंडिया'च्या मंचावर दिली होती ऐश्वर्याला टक्कर, आज ही सुंदरी झाली संन्यासी
बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेची क्रेझ सगळ्यांमध्येच पाहायला मिळतं. या झगमगत्या दुनियेत नशीब आजमाव अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण इथे येण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. मात्र, यात असेही काही कलाकार आहेत जे या झगमगत्या विश्वाला कंटाळून त्यांनी इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर 'मिस इंडिया' सारखा मोठा मंचही गाजवला आहे. मात्र, लक्झरी आयुष्य जगणाऱ्या या अभिनेत्रीने या सगळ्या गोष्टींचा त्याग करत विरक्त आयुष्याची निवड केली. आजही अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर झाली असून तिने जीवनातूनही संन्यास घेतला आहे.
सोशल मीडियावर सध्या चर्चा होतीये ती लोकप्रिय अभिनेत्री बरखा मदान (barkha madan) हिचे. एकेकाळी बरखाने मिस इंडियाचा मंच गाजवला. या मंचावर तिने सुश्मिता सेन (sushmita sen), ऐश्वर्या राय (aishwarya rai) या विश्वसुंदरींना टक्कर दिली होती. इतकंच नाही तर तिने कलाविश्वातही नशीब आजमावलं होतं. मात्र, या सगळ्याचा त्याग तिने आता केला आहे.
१९९४ मध्ये मिस इंडियामध्ये सहभागी होणाऱ्या बरखाला मिस टुरिझ्म इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच मलेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत तिला तिसरं स्थानही मिळालं होतं. त्यामुळे तिच्या सौंदर्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झाली होती. परंतु, २०१२ मध्ये तिने सन्यासी होण्याचा निर्णय घेतला.
बरखाने २०१२ मध्ये विलोभनीय जीवनाचा त्याग करत सन्यासी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने बौद्ध भिक्षू म्हणून दिक्षा घेतली. आज ती ग्यालटेन समतेन या नव्या नावाने ओळखली जाते. सध्या बरखा हिमालय पर्वतरांगा असलेल्या परिसरामध्ये तिचं जीवन घालवत आहे.
दरम्यान, बरखाने १९९६ मध्ये आलेल्या खिलाडियों का खिलाडी या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात तिने अक्षय कुमार, रेखा, रविना टंडन या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती. सोबतच तिने २००३ मधील भूत या सिनेमातही काम केलं होतं. तिने न्याय’, ‘1857 क्रांति’,‘सात फेरे’ या मालिकांमध्येही काम केलं होतं.