बॅण्ड बाजा बारात...! मलायका व अर्जुन अडकणार लग्नबेडीत?, अर्जुनने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:20 IST2020-01-02T19:20:00+5:302020-01-02T19:20:00+5:30

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू आहे.

Band Baja Baraat ...! Malaika and Arjun getting married soon, Arjun said about it अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकानं तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडिया शेअर केल् | बॅण्ड बाजा बारात...! मलायका व अर्जुन अडकणार लग्नबेडीत?, अर्जुनने केला खुलासा

बॅण्ड बाजा बारात...! मलायका व अर्जुन अडकणार लग्नबेडीत?, अर्जुनने केला खुलासा


अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकानं तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडिया शेअर केल्यानंतर हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात, असं बोललं जात आहे. त्या दरम्यान अर्जुन कपूरने मलायकासोबत लग्न करण्याबाबत खुलासा केला. त्यात त्याने लग्न कधी करणार हे सांगितलं नसलं तरी त्याच्या प्लानिंगबद्दल सांगितलं.

अर्जुन कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा प्लान शेअर केला. यासोबतच त्याचं लग्न गुपचूप होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. अर्जुन म्हणला, सध्या तरी आमचा लग्नाचा कोणताही विचार नाही. पण जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना बोलवेन. माझी पूर्ण फॅमिली बिग फॅट वेडिंगमध्ये विश्वास ठेवते. त्यामुळे माझं लग्न छोट्या स्वरुपात होणार नाही. त्यामुळे आता जेव्हा अर्जुनचं लग्न होईल तेव्हा त्याबद्दल सर्वांना समजेल हे नक्की.


या आधी मलायका अरोरानं नेहा धुपियाचा चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं अर्जुन आणि तिच्या नात्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार मलायका अर्जुन बद्दल म्हणाली, ‘अर्जुन प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे मात्र त्याला पैसे सांभाळता येत नाहीत.’

याशिवाय मलायकानं अर्जुन आणि तिच्या लग्नाविषयी सुद्धा यावेळी चर्चा केली. तिच्या बोलण्यावरुन तरी ती लग्नासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसत आहे.


ड्रीम वेडिंग बद्दल बोलताना मलायका म्हणाली, ‘माझं ड्रीम वेडिंग बीचवर होईल आणि हे एक व्हाइट वेडिंग असेल. लग्नात मला Elie Saab gown घालायचा आहे आणि माझी गर्ल्स गँग माझ्या ब्राइडमेट्स असतील. मला ब्राइडमेट्स ही संकल्पना खूप आवडते त्यासाठी मला व्हाइट वेडिंग करायचं आहे.’

याआधीही मलायका आणि अर्जुनला त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं गेलं होतं. मात्र प्रत्येकवेळी हा विषय त्यांनी टाळला होता. सध्या तरी आम्ही एकमेकांना वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Web Title: Band Baja Baraat ...! Malaika and Arjun getting married soon, Arjun said about it अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकानं तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडिया शेअर केल्

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.