/>अ भिनेत्री लारा दत्ता सध्या तिच्या आगामी प्रभुदेवा दिग्दर्शित 'सिंह इल ब्लिंग' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असुन यात अक्षय कुमार आणि एमी ज्ॉक्सन मुख्य भूमिकेत आहेत. लारा एका अनोख्या आणि चुलबुल्या अंदाजात दिसणार आहे. अक्षयकुमारच्या सांगण्यावरून आपण हा चित्रपट करत असल्याचेही लाराने स्पष्ट केले. लारा आणि अक्षयच्या अफेअरबाबतच्या बातम्याही काही काळापुर्वी रंगल्या होत्या तो भाग वेगळा. लारा म्हणाली की, प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत अशी हटके भुमिका या चित्रपटात ती साकारत आहे. लारा पुढे म्हणाली की,' जुन्या पिढीपेक्षा हा काळ खुप चांगला असुन या काळात खास अभिनेंत्रींना वाव देण्यासाठी चांगल्या भुमिकांची निर्मिती होत आहे. अभिषेक कपूर चा 'फितुर' आणि क्रिकेटपटु मोहम्मद अजहरूद्दीन च्या आयुष्यावर आधारित इम्रान हाश्मीची प्रमुख भुमिका असलेला 'अजहर' हे दोन चित्रपट सध्या लाराचे आगामी प्रोजेक्ट आहेत.