वरुणच्या ‘ढिशूम’ला पाकिस्तानमध्ये बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 20:23 IST2016-07-31T14:53:06+5:302016-07-31T20:23:06+5:30
रोहित धवन दिग्दर्शित नुकताच रिलीज झालेला ‘ढिशूम’ या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अभिनेता वरुण धवन हा ...

वरुणच्या ‘ढिशूम’ला पाकिस्तानमध्ये बंदी
या चित्रपटात वरुण हा जुनैद अन्सारी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची स्टोरी भारताच्या मुख्य खेळाडूच्या आसपास फिरणारी आहे. पाकिस्तान सोबत असलेल्या सामन्यापूर्वी त्याचे अपहरण केले जाते. त्याला शोधण्यासाठी जॉन अब्राहम यास भारतातून पाठविण्यात येते. रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटात वरुण सोबतच जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आहेत. चित्रपटाची सुरुवात ही चांगली झाली, परंतु, पुढे काय होते बघूया.