एकताचे ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ बंद होण्याच्या मार्गावर !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 16:02 IST2016-09-02T10:32:47+5:302016-09-02T16:02:47+5:30
एकताला चित्रपट बनवण्यात यश मिळत नसल्याने चित्रपट निर्मितीत पैसे गुंतवून पश्चाताप करण्याची वेळ आली असल्याचे सूत्राकडून समजते. एकता कपूरचे ...
एकताचे ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ बंद होण्याच्या मार्गावर !!!
विशेष म्हणजे एकताच्या 'बालाजी मोशन पिक्चर्स'चे पाच चित्रपट सलग बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरचे आहेत. त्यात 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'क्या कूल हैं हम -3', 'उड़ता पंजाब', 'अझर' आणि 'ए फ्लाइंग जट्ट' या चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे एकता खूप नाराज झाली असून तिची झोप उडाली आहे.
एकेकाळी टीव्हीवर अधिराज्य गाजवणारी एकता कपूर चित्रपट निर्मितीमुळे गोत्यात आली आहे. चित्रपट हिट करण्यासाठी तिने अनेक मार्ग हाताळले पण यश मिळाले नाही. 'अझर' आणि 'उडता पंजाब' चित्रपटामुळे बराच वाद निर्माण झाला होता. हे दोन्ही चित्रपट आॅनलाईन लिक झाले होते. त्याचा मोठा फटका बसला. 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपटात तिने सेक्स कॉमेडीचा आधार घेतला होतापण तरीही पदरी निराशाच आली. 'ए फ्लाइंग जट्ट' चित्रपट आपटल्यानंतर नवीन चित्रपट निर्मितीचे काम रोखण्यात आले आहे.
'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून एकताला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाला अपयश मिळाले तर मात्र पुन्हा चित्रपट बनवायचा नाही असाच निर्णय ती घेऊ शकते.